बाधित रुग्णांचे मृत्यू प्रकरण मृत्यू अन्वेषण समितीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:13+5:302021-04-01T04:36:13+5:30

अंजना हार्ट हॉस्पिटल मध्ये दोन दिवसात तीन रुग्णांचे मृत्यू झाले होते. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता एका रुग्णाचा मृत्यू झाला ...

Cases of death of infected patients to Death Investigation Committee | बाधित रुग्णांचे मृत्यू प्रकरण मृत्यू अन्वेषण समितीकडे

बाधित रुग्णांचे मृत्यू प्रकरण मृत्यू अन्वेषण समितीकडे

अंजना हार्ट हॉस्पिटल मध्ये दोन दिवसात तीन रुग्णांचे मृत्यू झाले होते. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी रात्री १वाजता व सकाळी १० वाजता आणखी एक रुग्ण दगावला होता. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. याबाबत जिल्हाधिकारी संजय यादव यांनी तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची झाडाझडती घेतली असता ९ ऑक्सिजन सिलिंडर आढळले होते. तसेच काही कागदपत्रे व फोटोग्राप्स घेण्यात आले असून ते जिल्हा शल्यचिकित्सक अध्यक्ष असलेल्या मृत्यू अन्वेषण समितीकडे सोपवण्यात आले आहेत. रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध मृत्यू अन्वेषण समिती घेणार आहे.

दरम्यान, रुग्णालयात पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होते. रुग्ण गंभीर परिस्थितीत दाखल झाले होते. त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे डॉ. दीपक शिंदे यांचे म्हणणे आहे.

Web Title: Cases of death of infected patients to Death Investigation Committee