बळसाणे चौफुलीवर बसचालकास मारहाण; चार जणांविरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल

By अतुल जोशी | Updated: August 31, 2023 18:13 IST2023-08-31T18:11:51+5:302023-08-31T18:13:39+5:30

याप्रकरणी चार जणांविरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. 

Bus driver assaulted at balsane Chauphuli A case has been registered against four people in Shindkheda police | बळसाणे चौफुलीवर बसचालकास मारहाण; चार जणांविरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल

बळसाणे चौफुलीवर बसचालकास मारहाण; चार जणांविरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल

धुळे : अपेक्षित स्थळावर बस न थांबविता पुढे थांबविली या कारणावरून वाद घालत चालक आणि वाहकाला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील देवी गावातील बळसाणे चौफुलीवर बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. 

दोंडाईचा डेपोचे चालक प्रमोद प्रकाश पाटील (वय ४२, रा. कापडणे ता. धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, देवी गावातील बळसाणे चौफुलीवर बस आली तेव्हा काही खासगी वाहने उभी होती. त्यामुळे बस साधारण ५० मीटर पुढे जाऊन थांबली. बस ही स्टॉपपासून पुढे का थांबविली. आमच्या शाळकरी मुलांना त्यामुळे त्रास झाला या कारणावरून वाद घालण्यात आला. वाद विकोपाला गेल्याने शिवीगाळ करत चालक आणि वाहकाला हाताबुक्क्याने मारहाण करण्यात आली. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. 

ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास शिंदखेडा पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक गोरावडे घटनेचा तपास करीत आहेत.
 

 

 

Web Title: Bus driver assaulted at balsane Chauphuli A case has been registered against four people in Shindkheda police