शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

पिंपळनेरात दोन ठिकाणी घरफोडी, हजारो रूपयांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:48 PM

दोन्ही घरमालक बाहेरगावी , पोलीस स्टेशनला अद्याप गुन्हा दाखल नाही

आॅनलाइन लोकमतपिंपळनेर (जि.धुळे)- येथील सटाणा रोडवरील एन. के. पाटील नगरात मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. चोरट्यांनी घरातून सोनसाखळी, अंगठी, चांदीचे दागिने आणि एलईडी टीव्ही संच लंपास केल्याची माहिती या कॉलनीतील रहिवाशांकडून मिळाली आहे. दरम्यान घरमालक बाहेरगावी गेले असल्याने नेमके कितीचा मुद्देमाल गेला हे समजू शकलेले नाही. तसेच गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाही.प्राध्यापक मधुकर भटू एखंडे यांचा काही महिन्यापूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी बाहेर गावी गेल्या आहेत. प्रा.एखंडे यांच्या घराला दोन-तीन दिवसापासून कुलूप होते. याचा चोरांनी फायदा घेत घराच्या प्रवेश द्वाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. व कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून चोरीचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तेथे काहीच मिळाले नाही. त्यानंतर चोरांनी आपला मोर्चा दुसऱ्या घराकडे वळविला. याच कॉलनीतील विद्युत महामंडळातील निवृत्त अधिकारी व्ही. एन. नंदन यांच्या घरातील प्रवेश द्वाराला असलेल्या गेटचा कडीकोंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. चोरांनी घरातील कपाटी मधील सामान अस्ताव्यस्त करून त्यातून सोनसाखळी, अंगठी, चांदीचे दागिने तसेच एलईडी टीव्ही संच चोरांनी लंपास करून नेल्याची प्राथमिक माहिती येथील रहिवाशांकडून मिळाली. दोन्हीही घर मालक बाहेरगावी असल्याकारणाने घरातील आणखी कायकाय साहित्य चोरीस गेले हे समजू शकले नाही. घरमालक आल्यानंतर याचा उलगडा होईल.जवळच राहत असलेले धनंजय पाटील यांनी पोलिसात फोन लावून माहिती दिली. या ठिकाणी पोलिसांनी येऊन पहाणी केली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.