दोंडाईचामध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:33 AM2021-01-13T05:33:25+5:302021-01-13T05:33:25+5:30

दोंडाईचा नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस हिरवा झेंडा दाखवून डीवायएसपी कुमावत ...

Bicycle rally in Dondaicha under 'Majhi Vasundhara' campaign | दोंडाईचामध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅली

दोंडाईचामध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅली

Next

दोंडाईचा नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस हिरवा झेंडा दाखवून डीवायएसपी कुमावत यांनी उद्‌घाटन केले.

सायकल रॅलीत दोंडाईचा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, जितेंद्र गिरासे, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, दोंडाईचा हौशी सायकलिस्टचे राजन मोरे, प्रीतम भावसार, परिमल कौटुंरवार, महेंद्र बाविस्कर, कृष्णा नगराळे, भरतरी ठाकूर, हितेंद्र महाले, चिरंजीवी चौधरी, युसूफ कादियानी, उपमुख्यधिकारी हर्षल भामरे, आरोग्य निरीक्षक शरद महाजन, रोटरी सिनीअर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, ‘लायन्स’चे अध्यक्ष हमजा जिनवाला, राकेश अग्रवाल, सुनील शिंदे, आदींसह नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रास्ताविकात मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखता यावा, शहर स्वच्छ सुंदर व हरित व्हावे म्हणून शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियानाची सुरुवात केली आहे. जल, वायू, आकाश, पृथ्वी व अग्नी या निसर्गाच्या पंचातत्त्वांवर आधारित अभियान आहे. अभियानात दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेने सहभाग घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत घनकचऱ्याचे जागेवरच विलगीकरण करण्यावर भर आहे.

यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन म्हणा, मधुमेहाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शरीर स्वास्थ्यासाठी सायकल चालविणे गरजेचे आहे. दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किमान एक दिवस म्हणजे सोमवारी सायकलीवरून कार्यालयात यावे. शहरात ५० ओपन स्पेस विकसित करण्यात आल्या असून त्यांचा शरीरस्वास्थ्यासाठी वापर व्हावा. प्रत्येक व्यक्तीने शहरात फिरताना वाहनाऐवजी सायकलीचा वापर केल्यास वजन नियंत्रित होण्यास मदत होईल. यावेळी कृष्णा नगराळे, विक्रम पाटील, जितेंद्र गिरासे, आदींनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Bicycle rally in Dondaicha under 'Majhi Vasundhara' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.