शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, तरुणाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 22:38 IST

अपघाताची ही घटना सोमवारी दुपारी घडली

धुळे : शहरातील चाळीसगाव रोडलगत शंभरफुटी रस्त्यावर भरधाव वेगाने येणारी दुचाकी दुभाजकावर आदळली. अपघाताची ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलिसांनी धाव घेत होती. धुळे तालुक्यातील बोरविहिर येथील सोनू वाल्मिक पगारे (२३) हा तरुण धुळ्यात काही कामानिमित्त आलेला होता. चाळीसगाव रोडलगत शंंभर फुटी रोड असून या ठिकाणी दुभाजक आहे. भरधाव वेगात असलेल्या या तरुणाकडून चालवित असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुभाजकाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की तो याच ठिकाणी असलेल्या एका खांबाला त्याची धडक बसली. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. अपघात होताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती. अपघात झाला असून तरुण गंभीर असल्याची माहिती येथून जवळच असलेल्या चाळीसगाव रोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तरुणाला उचलले आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषीत केले. अपघाताची प्राथमिक नोंद चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.