वादळी वाऱ्यासह गारपीट, पावसाला सुरुवात होताच महामंडळाकडून बत्तीगुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 15:39 IST2021-05-22T15:38:37+5:302021-05-22T15:39:21+5:30
बोराडीसह परिसरात आज २२ मे रोजी दुपारपर्यंत सूर्य तापून उकाड्यामुळे नागरिक कासावीस करीत असताना दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत सोसाट्याचा वारा सुटला

वादळी वाऱ्यासह गारपीट, पावसाला सुरुवात होताच महामंडळाकडून बत्तीगुल
धुळे - बोराडी ता. शिरपूर - बोराडी परिसरात अचानक वातावरणात बदल वादळी वाऱ्यासह पाऊसाला सुरवात झाल्याने शेतकरी बांधवांची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यात शेतात उघड्यावर असलेल्या गुरांच्या चाऱ्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाला सुरुवात होताच वीज महामंडळाने वीज पुरवठा बंद केला आहे.
बोराडीसह परिसरात आज २२ मे रोजी दुपारपर्यंत सूर्य तापून उकाड्यामुळे नागरिक कासावीस करीत असताना दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत सोसाट्याचा वारा सुटला. तसेच, विजेच्या कडकडाटासह गारपीट व पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत असून उन्हाळी पिके काढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, शेतमाल व चारा अजूनही शेतात असताना अशा अचानक आलेले पावसाने शेतकरी बांधवांना धावपळ करावयास लावली. या पावसाने शेतातील चारा व शेतमालचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.