शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पीकावर करपा रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:28 IST

रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात कांदा पिकावर करपा रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विभागाने उपाययोजना सुवचाव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मालपूरसह परिसरात कांदा उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. यावर्षी सुरुवातीच्या पाणी टंचाईमुळे कांदा उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने यावर्षी कांदा लागवड केली. हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. अशावेळी कांदा रोप टाकून कांदा लागवड केली आहे. सध्या बाजारात देखील बºयापैकी भाव सुरू असल्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र अचानक करपा या रोगाचे कांद्यावर आक्रमण झाल्यामुळे पुन्हा शेतकºयांच्या स्वप्नांवर पाणी फिरताना दिसून येत आहे.येथील कांद्याच्या परतीच्या तसेच सततच्या पावसाचा देखील मोठा फटका बसला आहे. अशाही परिस्थितीत येथील शेतकºयांनी योग्य रासायनिक खतांची मात्रा व महागडे नामांकीत कंपनीचे किटक नाशके, बुरशी नाशकांची फवारणी करुन कांदा पात चांगली वाढीस लागवल व कांद्याची पात जमल्यास कांदा चांगला पोसला जातो असा येथील शेतकºयांचा अनुभव आहे. मात्र या करपा रोगामुळे होत्याचे होताना दिसून येत आहे.आता पावसाने चांगली उघडीप दिली असून उन्हाचे प्रमाण देखील योग्य आहे. अशावेळेला कांद्याचे पाणी तोडून या योग्य वातावरणामुळे जमलेल्या पाताचा रस खाली उतरुन कांदा पोसला जाणार होता. मात्र या करपामुळे संपूर्ण पात करपून वाकडी-तिकडी होत असल्यामुळे याचा कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. अगदी हातातोंडाशी घास आलेला असताना हे संकट उभे राहिल्यामुळे येथील शेतकºयांना कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची खुप गरत आहे.यावर्षी खरीपातले कडधान्य पीक सुरुवातीच्या पावसाच्या अंतरामुळे वाया गेले तर भुसारातील बाजरी-ज्वारी, मका आदी पिके येथे २० जुलैच्या सुरु झालेल्या अखंड सतत तसेच परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे कणसावरच कोंब फुटून सडून गेली तर कापसाचे यावर्षी येथे मोठे क्षेत्रफळ दिसून येत असून संपूर्ण कापूस भिजून गेला आहे. या कापसाला ओल्याव्याचे कारण व्यापारी सांगून मातीमो भावाने खरेदी करतात शिवाय मजुरी देखील जास्त लागत असून घरात देखील साठवता येत नसल्यामुळे मजुरी व भागभांडवलाचा खर्च वजा जाता हातात येथील शेतकºयांच्या काहीच शिल्लक रहात नसल्यामुळे संपूर्ण मदार कांदा पिकावर होती व बाजारातील आजचा भाव बघता खूप उमेद बाळगत असताना या करपा रोगाच्या आक्रमणामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला असून कृषी विभागाने येथे भेट देऊन शेतकºयांना उपाययोजना सुचवाव्यात, अशी येथील शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे