जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST2021-02-08T04:31:23+5:302021-02-08T04:31:23+5:30

येथील सैनिक लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर (मुंबई) अध्यक्षस्थानी होत्या. सावित्रीबाई फुले ...

Asha Swayamsevaks and group promoters felicitated in the district | जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा सत्कार

जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा सत्कार

येथील सैनिक लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर (मुंबई) अध्यक्षस्थानी होत्या. सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात झाली.

मेळाव्यात कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून योगदान देणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा प्रातिनिधिक स्वरुपात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना आणि सुभराऊ फाऊंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्ध्यांचे प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना केरळ, तामिळनाडू, हरियाणाच्या धर्तीवर राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना दरमहा मानधन, पेन्शन, भाऊबीज आणि कामाच्या मोबदल्यात वाढ मिळविण्यासह अन्य प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी संघटनेची ताकद वाढवून संघटित लढा उभारणे गरजेचे आहे. असे माया परमेश्वर यांनी सांगितले. आशांनी कोरोना मुक्तिसाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असून, या योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात येत असल्याचे सुभराऊ फाऊंडेशन अध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी सांगितले. ॲड. गजानन थळे (मुंबई), उपाध्यक्ष युवराज बैसाणे (धुळे) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुधीर परमेश्वर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल बैसाणे यांनी आभार मानले.

Web Title: Asha Swayamsevaks and group promoters felicitated in the district