सफरचंदाचा ट्रक महामार्गावर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:52 IST2019-11-25T22:51:31+5:302019-11-25T22:52:02+5:30
सांजोरी फाटा : हजारो रुपयांचे नुकसान

सफरचंदाचा ट्रक महामार्गावर उलटला
धुळे : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील सांजोरी फाट्यावर सफरचंद घेऊन जाणारा ट्रक खड्डा असल्यामुळे उलटला़ चालकाच्या दक्षतेमुळे जीवितहानी टळली़ या अपघातात ट्रकसह मालाचे नुकसान झाले आहे़
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या कामाबद्दल सुरुवातीपासूनच तक्रारी होत आहेत़ धुळे तालुक्यातील फागणे ते नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या १३४ किमीच्या अंतरात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे म्हणून स्थानिकांनी एकत्र येऊन आंदोलनाचा मार्ग स्विकारला़ शेतकरी संघ या नावाने संघटीत झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलने करीत प्रशासनाला निवेदन देखील दिले आहेत़ संबंधित कंपनीच्या अधिकाºयांनी सुध्दा वेळोवेळी केवळ आश्वासने दिली आहेत़ परिणामी गेल्या ३० आॅक्टोबरला एकाच दिवशी फागणे ते नवापूर दरम्यान चार ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघाने दिला होता़ तथापि, कंपनीच्या अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत १५ दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते़ त्याचे पुढे काय झाले हाच प्रश्न आहे़ आजही हे खड्डे तसेच असल्याने अपघात होत आहेत़
सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरजे १९ जीजी २३७८ क्रमांकाचा ट्रक गुजरात राज्याकडून सफरचंद घेऊन धुळ्याकडे येत असताना धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावाजवळील सांजोरी फाट्यालगत रस्त्यावर कुठलाही फलक न लावल्याने ट्रक चालकाने वाहन सरळ नेले़ पुढे अचानक रस्ता संपल्याने ट्रक वळवावा लागला़ त्याचवेळी ट्रकचे चाक खड्यात गेल्याने वाहन उलटले़ चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी झाली नाही़ मात्र, ट्रकसह मालाचे नुकसान झाले आहे़ यावेळी वाहन चालकाकडून संताप व्यक्त करण्यात आला़ अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती़
दरम्यान, नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अपघाताची मालिका सुरु असून अनेकदा तक्रारी करुन स्थानिकांची आंदोलने होऊन देखील रस्ता दुरुस्त होत नसल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली़