शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

४२ लाखांची अपसंपदा जमा केल्याप्रकरणी राजेंद्रकुमार गावित यांच्या नटावद येथील घराची एसीबीकडून झडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 22:27 IST

अपसंपदा : पत्नीही चौकशीच्या फेऱ्यात

धुळे : मंत्रालयातील निवृत्त कक्ष अधिकारी राजेंद्रकुमार कृष्णराव गावित व त्यांच्या पत्नी तथा तत्कालीन पोलीस निरीक्षक इला गावित यांच्याविरुध्द ४२ लाखांची अपसंपदा बाळगल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस?्या दिवशी मंगळवारी नंदुरबार एसीबीच्या पथकाने नंदुरबारसह नटावद येथील घराची झाडाझडती घेण्याचे काम सुरू केले आहे़ या झडतीत नेमके काय मिळाले याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही़स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या नंदुबार जिल्ह्यातील दाम्पत्य अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल केला. या दोघांनी आपल्या मिळकतीपेक्षा ४२ लाख ४९ हजार ३४० रुपयांची अपसंपदा गोळा केल्याचे उघड झाले. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील प्रतापनगर येथील राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (५९) आणि त्यांची पत्नी ईला राजेंद्रकुमार गावित (५९) (मूळ राहणार नटावद, ता. जि. नंदुरबार) यांनी १ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत २ कोटी ४३ लाख ८१ हजार ४६१ रुपये संपादित केले. त्यापैकी १ कोटी ६ लाख ९५ हजार ५८२ रुपयांचा खर्च केला. राजेंद्रकुमार गावित यांनी १ कोटी ७९ लाख ३५ हजार २१९ रुपयांची मालमत्ता संपादित केली. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ४२ लाख ४९ हजार ३४० रुपयांची म्हणजेच १७.४२ टक्के अपसंपदा धारण केली असल्याचे परीक्षणातून निष्पन्न झाले. तसेच राजेंद्रकुमार गावित यांनी पत्नी ईला राजेंद्रकुमार गावित (स्वेच्छा निवृत्त पोलीस निरीक्षक) यांनी सदरची अपसंपदा स्वत:च्या नावे धारण करून साहाय्य केल्याचे समोर आले आहे.या दोघा अधिकाऱ्यांनी मिळविलेली मालमत्ता ही त्यांच्या उत्पन्नाशी विसंगत असल्याचे आढळून आले. चौकशीतून ही बाब प्रकषार्ने समोर आली. परिणामी दोघा सेवानिवृत्त पती-पत्नीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे (सुधारणा २०१८) कलम १३ (१) (अ), १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे