अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 18:09 IST2023-05-13T18:08:59+5:302023-05-13T18:09:28+5:30

शिंदखेडा तालुक्यातील घटना

Abusing a minor girl, a crime against murder | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाविरोधात गुन्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाविरोधात गुन्हा

धुळे : एका लहान बालिकेला गैरफायदा घेऊन एका नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना शिंदखेडा तालुक्यातील एका गावात घडली. हा प्रकार गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला. ही बाब पालकांना समजल्यानंतर नरडाणा पोलिस ठाण्यात एका नराधमाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर तालुक्यातील हेंद्र्यापाडा येथील एक परिवार रोजगारानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आलेले आहे. त्याच गावात राहणाऱ्या एकाने ४ वर्षांच्या बालिकेला विश्वासात घेऊन काहीतरी फूस लावली. गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरी कोणीही नसल्याची संधी साधून त्या नराधमाने तिला गोड बोलत नदीच्या पलीकडे झाडाझुडपात घेऊन गेला. या ठिकाणी त्याने बालिका अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन त्या बालिकेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर पीडित बालिकेला सोडून दिल्यानंतर बालिका घरी आली. तिने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.

लागलीच पालकांनी नरडाणा पोलिस ठाणे गाठून नराधमविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भादंवि कलम ३७६, ३७६ (अ) (ब) ३७७ सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ५ (एम) (यू) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज कुंवर करीत आहेत.

Web Title: Abusing a minor girl, a crime against murder