Dhule: भीषण आगीत स्पोर्टसचे दुकान जळून खाक

By देवेंद्र पाठक | Published: August 12, 2023 11:21 PM2023-08-12T23:21:15+5:302023-08-12T23:23:43+5:30

Dhule: धुळे शहरातील झाशीच्या राणी पुतळा चाैकात असलेल्या राजू अहिरे यांच्या प्रियंका स्पोर्टस् नावाच्या दुकानाला शनिवारी ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

A sports shop was gutted in a fierce fire | Dhule: भीषण आगीत स्पोर्टसचे दुकान जळून खाक

Dhule: भीषण आगीत स्पोर्टसचे दुकान जळून खाक

googlenewsNext

- देवेंद्र पाठक 
धुळे - शहरातील झाशीच्या राणी पुतळा चाैकात असलेल्या राजू अहिरे यांच्या प्रियंका स्पोर्टस् नावाच्या दुकानाला शनिवारी ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने राैद्ररुप धारण केले. दुकानातील सर्व स्पोर्टसचे साहित्य जळून खाक झाले. अग्नीशमन बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली.

शहरातील झाशी राणी पुतळा चाैकात प्रबोधनकार ठाकरे संकुलात प्रियंका स्पोर्टस नावाचे राजू अहिरे यांचे दुकान आहे. या दुकानात खेळाशी संबंधित सर्व साहित्य उपलब्ध आहे. दुकानाच्या मागील बाजूस त्यांच्या मालकीचे ३ ते ४ गाळे आहेत. या गाळ्यात त्यांनी विविध साहित्य ठेवलेले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानातून धूळ निघत असल्याचे लक्षात आले. काही क्षणातच आग लागली. परंतु गाळे बंद असल्याने आग मधल्यामध्ये लागून त्याचा धूळ मोठ्या प्रमाणावर निघत होता. शटरला लावलेले कुलूप तोडण्यात आले. अग्नीशमन बंबाच्या दोन वाहनांनी ६ फेऱ्या करुन आग आटोक्यात आणली. शहर पोलिसांचा बंदोबस्त हाेता.

Web Title: A sports shop was gutted in a fierce fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.