शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

लाटीपाडा धरणात ५० टक्के पाणी साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:59 IST

साक्री तालुका : संततधार पावसामुळे बहुतांश धरणात १०० टक्के साठा, पिकांना मिळाले जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री/पिंपळनेर : गेल्या आठ दिवसांपासून संततधार पावसामुळे साक्री तालुक्यातील बहुतांश धरण १०० टक्के भरले असून लाटीपाडा धरणात ५० टक्के पाणी साठा झाला आहे. तसेच पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून पिकांना जीवदान मिळाले आहे.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी लाटीपाडा धरणाचा जलसाठा हा फक्त अर्धा ते एक टक्का एवढा होता. तसेच खरीप हंगामात पिकांची पेरणी झालेली असतांना पाऊस लांबल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या होत्या. परंतू गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु झाल्याने पिकांना मोठा आधार मिळाला आहे. तसेच लाटीपाडा धरण ५० टक्के भरले आहे. यंदा तीव्र उन्हाळा असल्याने पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. तसेच नदीतही जेमतेमच पाणी होते. परंतू गेल्या आठ दिवसांपासून पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने पश्चिम पट्ट्यातील नदी-नाले पाण्याने भरुन ओसंडून वाहून निघाल्याने हे सर्व पाणी लाटीपाडा धरणात येत आहे. यामुळे धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. येणाºया काही दिवसांमध्ये याच प्रमाणात पाऊस आल्यास लवकरच लाटीपाडा धरण ओसंडून वाहून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पावसाचे योग्यवेळी आगमन झाल्याने खरीप हंगामातील शेतकºयांची पिकेही शेतांमध्ये हिरवीगार झाल्याचे पाहण्यास मिळत आहे तर दुबार पेरणीचे मोठे संकट दूर झाले आहे. पिंपळनेरच्या पश्चिम पट्टयात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने जोर कायम ठेवल्याने पांझरा नदी वाहून निघाली आहे. भात शेतीची रोपणी सुरुतसेच भात शेतीची रोपणी मोठया प्रमाणात सुरू आहे. यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर शेतकरी बांधवांना लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहण्यासाठी तरी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.जलयुक्त बंधारे तुडूंबजलयुक्त शिवारअंतर्गत झालेले लहान-लहान बंधारे, तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मालपुर- कासारे दरम्यान असलेला बंधारा यावर्षी पूर्ण करण्यात आला आहे. या बंधाºयामुळे मोठया प्रमाणात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण झाल्याने पाण्याचा फ्लो मोठया अंतरापर्यंत मागे गेला आहे. यामुळे मालपुर आणि कासारे ही दोन्ही गावे एखाद्या धरणाच्या काठावर वसलेली आहेत, असे नयनरम्य चित्र निर्माण झाले आहे. लघु सिंचन विभागाने बांधलेल्या या बंधाºयामुळे दोन्ही गावांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाने मोठी दडी मारली होती. यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहते कि काय, अशी भीती व्यक्त होत होती. परंतू वरुणराजाने कृपा केल्याने तालुक्यातील धरणे भरली असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे