धुळ्यात पोलीस अधिकाºयांची ३५ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:27 PM2017-12-04T22:27:46+5:302017-12-04T22:28:31+5:30

धुळे जिल्हा : कर्मचाºयांवर पडतोय ताण, पाठपुराव्याची आवश्यकता

35 posts of Police officers in Dhule are vacant | धुळ्यात पोलीस अधिकाºयांची ३५ पदे रिक्त

धुळ्यात पोलीस अधिकाºयांची ३५ पदे रिक्त

Next
ठळक मुद्देकामांचा जाणवणारा ताण लक्षात घेता रिक्त पदांकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी रिक्त पदे भरण्याची गरज

देवेंद्र पाठक। 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांचे पुरेशाप्रमाणात संख्याबळ असणे गरजेचे आहे. परंतु जिल्ह्यात  ३५ पोलीस अधिकाºयांची पदे रिक्त आहे. त्याचा ताण इतर कर्मचाºयांवर पडतो़  पोलिसांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे़ 
धुळे जिल्हा हा गुजरात-मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून  गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. चोºयांसह किरकोळ कारणावरून हाणामाºयांचे प्रमाणही वाढत  आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनावर गुन्ह्यांच्या शोध कामी ताण वाढत आहे़ हा ताण कमी करण्यासाठी अधिकाºयांसह पोलिसांची रिक्त पदे तातडीने भरल्यास कामाची विभागणी होऊन ताण कमी होण्यास मदत होऊ शकेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ 
जिल्ह्यात पोलिस कर्मचाºयांच्या १ हजार ८५१ पदांना मंजूरी आहे़ यापैकी केवळ २५ पदे आजही रिक्तच आहे़ ती भरण्यासाठी प्रशासकीय पाठपुरावा गरजेचा आहे़ याशिवाय जिल्ह्यात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि पाच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची पदे नियमित भरण्यात आलेली असल्याने ती रिक्त नाहीत़ 
पोलीस निरीक्षकांची १८ पदे मंजूर असून १ पद रिक्त आहे़ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची २७ पदे मंजूर असून पैकी ६ पदे रिक्त आहेत़ पोलीस उपनिरीक्षकांच्या ९० पदांना मंजूरी आहे़ असे असलेतरी त्यात २८ पदे आजही रिक्तच आहेत़ 
असे एकूण १४२ अधिकाºयांच्या पदांना मंजूरी आहे़ मात्र त्यापैकी ३५ पदे रिक्तच आहेत़ रिक्त पदे त्वरीत भरण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. 

Web Title: 35 posts of Police officers in Dhule are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.