शहरं
Join us  
Trending Stories
1
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
2
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
5
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
6
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
7
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
8
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
9
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
10
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
11
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
12
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
13
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
14
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
15
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
16
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
17
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
18
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
19
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
20
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट

गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 9:58 PM

थाळनेर पोलिसांची कार्यवाही

थाळनेर :- शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे ५ वाजेच्या सुमारास केलेल्या नाकाबंदीत गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला़ पोलिसांनी ट्रकसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ अंधाराचा फायदा घेवून ट्रकचालकाने पळ काढला़थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी आपल्या पथकासह शिरपूर चोपडा रस्त्यावरील सावेर फाट्याजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास नाकाबंदी केली़ त्यावेळी आरजे १४ जीजे ३२७८ या ट्रकवर संशय आल्याने ट्रकला पोलिसांनी थांबवले. पोलिसांना पाहून ट्रक चालक आणि सहचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला़ परिणामी पोलिसांना संशय अधिकच बळावला़ ट्रकची तपासणी केली असत ट्रकच्या मागच्या बाजूस ११ लाख ५ हजार रुपये किंमतीचे ३६ गुरे ही आखूड दोरीने दाटीवाटीने बांधलेली आढळून आली़ तर १० लाख किंमतीचा ट्रक असा एकुण २१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पोलीस कर्मचारी विजय जाधव, सिराज खाटीक, आळंदे आदींनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे