अज्ञात वाहनाच्या धडकेत शिंदखेड्यातील नणंद-भावजयीचा मृत्यू; दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

By अतुल जोशी | Updated: February 16, 2023 19:43 IST2023-02-16T19:42:23+5:302023-02-16T19:43:29+5:30

अज्ञात वाहनाच्या धडकेत धुळ्यातील नणंद-भावजयीचा मृत्यू झाला. 

 2 women from Dhule died in a collision with an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत शिंदखेड्यातील नणंद-भावजयीचा मृत्यू; दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिंदखेड्यातील नणंद-भावजयीचा मृत्यू; दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

शिंदखेडा (धुळे) : देवास (मध्यप्रदेश) जवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शिंदखेडा येथील नणंद-भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शिंदखेडा येथील काही भाविक खासगी वाहनाने सिहोर येथे कथा ऐकण्यासाठी शिंदखेडा येथून बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास निघाले होते. गाडीत सात प्रवासी होते. या भाविकांची गाडी देवासजवळ थांबली होती. यावेळी  मंगलाबाई छोटू मिस्तरी (वय ४५) व सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी (वय ५५, दोन्ही रा. जनतानगर,शिंदखेडा) या नणंद भावजयी रस्ता ओलांडत असतांना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. 

हा अपघात रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. या  धडकेत सुनंदाबाई या जागीच ठार झाल्या. तर मंगलाबाई गंभीर जखमी झाल्याने, त्यांना तत्काळ शिरपूर येथील कॅाटेज रूग्णालयाात दाखल केले. मात्र डॅाक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. एकाच परिवारातील दोघ महिलांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुनंदाबाई मिस्तरी यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुले, दोन मुली असा परिवार अहे. तर मंगलाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. 

 

Web Title:  2 women from Dhule died in a collision with an unknown vehicle