जैतपूर परिसरात १२ मोरांचा मृत्यू, वन विभागात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 19:11 IST2021-07-01T19:08:48+5:302021-07-01T19:11:17+5:30

Jaitpur News : एका मोराची प्रकृती खराब असल्याने शिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

12 peacocks dead in Jaitpur area dhule | जैतपूर परिसरात १२ मोरांचा मृत्यू, वन विभागात खळबळ

जैतपूर परिसरात १२ मोरांचा मृत्यू, वन विभागात खळबळ

शिरपूर (धुळे) - तालुक्यातील जैतपूर परिसरातील १२ मोर मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आले असून विषयुक्त अन्न खाल्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर एका मोराची प्रकृती खराब असल्याने शिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. शिरपूर तालुक्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने वन्य प्राणी मित्रांमध्ये हळहळ करीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर या मोरांच्या मृत्यूने वन विभागात खळबळ व्यक्त करण्यात आहे.

शिरपूर तालुक्यातील जैतपूर परिसरात बागायती क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. तसेच बारमाही पिके जास्त प्रमाणात जास्त असल्याने अन्न व पाणी मुबलक असल्याने या परिसरात अनेक मोर वास्तव्यात आहेत. सध्या खरीपाचा हंगाम सुरू झाल्याने शेत शिवारात कापूस व इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे बियाणे किंवा रोपाला पेरण्या किंवा लावण्याअगोदर बियाण्याला विषारी औषध लावण्यात येते.तेच बियाणे मोरांनी उकरून खाल्याने मोरांचा मृत्यू झाल्याची संशय व्यक्त केला आहे. 
 

Web Title: 12 peacocks dead in Jaitpur area dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.