शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

१०० रिक्षाधारकांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

राज्यात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अखेरचा पर्याय म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे़ ती लागू करतांना ...

राज्यात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अखेरचा पर्याय म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे़ ती लागू करतांना अनेक निर्बंध लागू केले आहेत़ ते करीत असतांना गोरगरीब, हातावरील पोट असणाऱ्यांसाठी देखील राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे़ त्यानुसार परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये देण्याचे शासनाने घोषित केले आहे़ याचा लाभ आता केव्हा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे़ प्रत्यक्षात या तालुक्यात ४०० रिक्षाचालक असतांना परवानाधारक १०० पर्यंत आहे़ त्यानुसार आता या रिक्षा चालकांना राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे़ परंतु प्रत्यक्षात तो केव्हा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे़ असे असले तरी सध्याच्या महागाई इतकी आहे, त्यामध्ये सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे़ त्यामुळे राज्य शासनाकडून मिळणारी ही मदत किती पुरणार असा सवाल रिक्षा चालकांनी केला आहे़

राज्य सरकारच्या नवीन घोषणेनुसार तालुक्यातील रिक्षाचालकांना १ हजार ५०० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे, परंतु ही मदत खूपच तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालकांनी व्यक्त केली़ शासनाचे नियम व अटींमुळे केवळ बोटावर मोजण्याएवढे सुध्दा रिक्षा चालकांना ही मदत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे शासनाच्या या घोषणेमुळे रिक्षाचालकांना काहीच फरक पडणार नाही़

शिरपूर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्यामुळे शासनाने ब्रेक दि चेनमधील निर्बंधांची अंमलबजावणी बुधवारी रात्रीपासून सर्वत्र सुरू केली़ या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कडक कारवाई केली जाणार आहे़

शहरात रिक्षा चालकांची संख्या जवळपास ४०० पर्यंत असली तरी परवानाधारकांची संख्या १०० पर्यंत आहे़ दर ३ ते ५ वर्षांनी रिक्षाचे परमिट सोबत दरवर्षी वाहनाचा विमा, पासिंग व इतर टॅक्स खर्च १४ हजारांपर्यंत येत असतो़ गेल्या वर्षापासून लॉकडाऊन, संचारबंदी आणि कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशी देखील बाहेरगांवी पडत नसल्यामुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय होत नाही़ बहुतेक वेळा काही रिक्षा चालकांना ग्राहकच मिळत नसल्यामुळे पैसा देखील मिळत नसल्याची परिस्थिती आहे़ त्यामुळे त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालत असेल याची विचारणा न केलेली बरी़

राज्य सरकारच्या नवीन घोषणेनुसार आता रिक्षा चालकांना दीड हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. मात्र शासनाच्या नियम व अटींमुळे बोटावर एवढे रिक्षा चालकांना सुध्दा ही मदत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे शासनाने सरसकट ही मदत दिली तरच रिक्षा चालकांना लाभ होणार आहे़

शिरपूर तालुक्यातील परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या- १००

रिक्षाचालकांची प्रतिक्रिया

सरकारच्या नवीन घोषणेबाबत रिक्षाचालकांनी स्वागतच केले आहे़ मात्र शासनाने ती मदत सरसकट द्यावी़ नियम व अटी टाकू नये़ बोटावरच रिक्षा चालकांना ही मदत मिळू शकणार आहे़

- मोहन दिलीप येशी,

रिक्षा चालक

मागील वर्ष पूर्णपणे लॉकडाऊनमध्ये गेले, त्यातून अजूनही आम्ही सावरलेलो नाही़ त्यात आता पुन्हा लॉकडाऊन झाला आहे़ त्यातही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिली आहे़ त्यामुळे रिक्षा सुरू जरी राहिल्या तरी त्याचा फायदा आम्हाला काय होणाऱ

- दत्तू माळी,

अध्यक्ष, रिक्षा चालक युनियन संघटना शिरपूर

रिक्षा चालवतो तेव्हा आमचे घर चालते़ मागील वर्षी देखील लॉकडाऊन झाला तेव्हा महागाईने आग ओकली होती़ आता पुन्हा महागाई वाढत आहे़ त्यामुळे शासनाकडून मिळणाºया या तुटपुंज्या पैशात घर कसे चालवायचे असा प्रश्न पडला आहे़

- क

रिक्षा चालक