तेरमध्ये भरविणार यंदाचा पर्यटक सांस्कृतिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:23+5:302021-02-06T04:59:23+5:30

तेर : सुमारे अडीच हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तेरमध्ये यंदाचा पर्यटक सांस्कृतिक महोत्सव भरविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन ...

This year's tourist cultural festival will be held in thirteen | तेरमध्ये भरविणार यंदाचा पर्यटक सांस्कृतिक महोत्सव

तेरमध्ये भरविणार यंदाचा पर्यटक सांस्कृतिक महोत्सव

तेर : सुमारे अडीच हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तेरमध्ये यंदाचा पर्यटक सांस्कृतिक महोत्सव भरविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने घेतला आहे. या अनुषंगाने हालचाली देखील सुरू झाल्या आहेत.

सातवाहन काळातील ऐतिहासिक बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण करून रोम देशाबरोबर व्यापारी संबंध असणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील तेरमध्ये जगभरातील देशांना आकर्षित करणारा वारसा उभा आहे. या गावाला हिंदू, बौद्ध, जैन आदी धर्मांचा वारसा लाभलेला असून सातवाहन काळात तेर हे बौद्ध धर्माच्या प्रसाराचे केंद्र होते. त्या काळी तगर (तेर) हे सातवाहनांची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जात होते. असा ऐतिहासिक वारसा लाभलेला तेरचा इतिहास मौर्य काळ, सम्राट अशोक, सातवाहनपर्यंत आहे. त्यामुळे तेरमध्ये जगाच्या विविध देशांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक व इतिहास संशोधकांची नेहमी वर्दळ असते. याठिकाणी महाराष्ट्र शासनाचे कै. रामलिंग अप्पा लामतुरे वास्तूसंग्रहालय, दोन हजार वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक त्रिविक्रम मंदिर, उत्तरश्वर मंदिर, बौद्ध स्तूप (चैत्यगृह) जैन मंदिर, सातशे वर्षांपूर्वीची परंपरा लाभलेल्या संत गोरोबाकाका मंदिर, संत गोरोबाकाका यांचे घर (वाड्या) आदी ऐतिहासिक वास्तू उभ्या आहेत.

राज्य पुरातत्त्व खात्याने येथील १४ ठिकाणे राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित केली असून या ठिकाणी आतापर्यंत आठ वेळा उत्खनन झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाच्या पर्यटक विभागाच्या वतीने यंदाचा पर्यटक सांस्कृतिक महोत्सव तेरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चौकट..........

निधीचीही तरतूद

शासनाच्या पर्यटक विभागाच्या वतीने यंदाचा पर्यटक सांस्कृतिक महोत्सव तेरमध्ये साजरा करण्याबाबतचे पत्रक नुकतेच काढण्यात आले आहे. परंतु, त्याची रूपरेषा व कालावधी अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार हा महोत्सव फेब्रुवारी अखेरपर्यंत होण्याची शक्यता असून यासाठी पर्यटन विभागाकडून निधीचीही तरतूद केली जाणार आहे.

वास्तूसंग्रहालयात २४ हजार वस्तू

सातवाहन काळात तेरमध्ये हस्तीदंतावर कलाकुसर केली जात होती. तसेच रोमन देशातील माती कलाकार व इतर कारागीरदेखील याठिकाणी काम करीत होते. येथील रामलिंगअप्पा लामतुरे वास्तूसंग्रहालयात ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या २४ हजार वस्तू आहेत.

Web Title: This year's tourist cultural festival will be held in thirteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.