एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 22:27 IST2025-06-13T22:12:32+5:302025-06-13T22:27:04+5:30

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले.

Major fire breaks out in Mahim due to AC compressor explosion; Two die in blaze | एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

माहीम परिसरात मोठी आग लागली. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले. मात्र स्फोटामुळे दोघांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या होत्या. यामुळे या दोघांचा जागेवर मृत्यू झाला.


अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे कर्मचारी आणि माहीम पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत आगीत अडकलेल्या इतर लोकांना सुरक्षित बाहेर काढले. 
याप्रकरणी माहीम पोलीस आणि अग्निशमन दल अधिकचा तपास करत आहेत. 

Web Title: Major fire breaks out in Mahim due to AC compressor explosion; Two die in blaze