शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:56 IST

आम्ही मदतीसाठी आग्रही राहू, नुकसानीच्या तुलनेत मदत तुटपंजी; उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा

लातूर/धाराशिव: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनीही लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. काटगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधत "शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?" असा थेट सवाल केला.

'जमीनच वाहून गेली आहे, नवीन माती आणून टाकण्यासाठी मोठी मदत हवी,' असे सांगत शेतकऱ्यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि सरसकट कर्जमाफीची मागणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे. कुणीही या आस्मानी संकटामुळे खचून जाऊ नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका." ते म्हणाले की, सरकारकडून जाहीर झालेली मदत सन २०२३ च्या निकषांनुसार असून, नुकसानीची तीव्रता पाहता ती अत्यंत तुटपंजी आहे.

कर्जमुक्ती आणि मदतीसाठी आग्रही राहू"मराठवाडा, जो दुष्काळी म्हणून ओळखला जातो, तिथे पहिल्यांदाच पूरपरिस्थितीचे मोठे संकट ओढवले आहे. आता त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची हीच खरी वेळ आहे," असे ठाकरे म्हणाले. हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि कर्जमुक्ती या दोन्ही मागण्यांसाठी आपणही आग्रही राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तात्काळ मदत जाहीर करून उर्वरित मागण्यांसाठी सरकारवर दबाव कायम ठेवणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray questions government: Will you consult the almanac for farmers' aid?

Web Summary : Uddhav Thackeray, surveying flood damage in Marathwada, criticized insufficient government aid. He demanded ₹50,000 per hectare and complete loan waivers for affected farmers, urging the government to act swiftly and decisively.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRainपाऊसfloodपूरMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी