शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

घड्याळ जिथे, तुतारी नाही तेथे; विलिनीकरणाचे ठाऊक नाही मात्र, निवडणुकीत मनोमिलनाची पुष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:04 IST

धाराशिव जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी मिळून २८ जागांवर रिंगणात आहेत. यातील एकाही जागेवर ते आमनेसामने नाहीत.

धाराशिव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु होती, ती अंतिम टप्प्यात आली होती, असे दावे केले जाऊ लागले आहेत. या दाव्यांतील तथ्ये ती करणाऱ्यांनाच ठाऊक असली तरी, एक मात्र खरे. निवडणुकीपूर्वीच मनोमिलन झाल्याचे लढतींवरून स्पष्ट होत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी मिळून २८ जागांवर रिंगणात आहेत. यातील एकाही जागेवर ते आमनेसामने नाहीत. यावरून किमान मनोमिलनाला तरी पुष्टी मिळते.

धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना शरद पवारांची राष्ट्रवादी यात सहभागी होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात या चर्चेतून ती बाहेर पडली. उद्धवसेनेने पालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चेत फारसे स्वारस्य दाखवले नाही. जागावाटपावरून बिनसल्याच्या चर्चेला आता कोणताही अर्थ राहिला नाही. एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा व गटांमध्ये होत असलेल्या लढती पाहिल्यास हे पूर्वनियोजित नव्हते, असे म्हणण्यालाही कोणता अर्थ उरत नाही. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेची राळ अजितदादांच्या निधनानंतर या दोन दिवसांत उठली आहे. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादींनी उमेदवारी दाखल करतानाच समन्वय राखला होता की काय, त्यांच्यात पूर्वीच मनोमिलन घडून आले होते की काय, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. ५५ जागांपैकी दोन्ही राष्ट्रवादी २८ जागांवर लढतीत उतरल्या आहेत. यातील एकाही जागेवर ते आमनेसामने नाहीत, हे विशेष. यावरून किमान मनोमिलनाची तरी पुष्टी होते.

१२ जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी मैदानात...जिल्ह्यातील ढोकी, तेर, उपळा, पाडोळी, इटकूर, मंगरुळ, शिराढोण, खामसवाडी, आलूर, मंगरुळ, शहापूर, नंदगाव या १२ गटांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी एकाही ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानात नाही.

सोळा गटांमध्ये घड्याळ लढतीत...अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बेंबळी, मोहा, पारगाव, पारा, तेरखेडा, ईट, सुकटा, पाथरुड, वालवड, आष्टा, शेळगाव, अनाळा, जवळा, डोंजा, लोणी, बलसूर, सास्तूर या १६ गटांमध्ये उमेदवार दिले आहेत. त्यांच्याविरोधात तुतारीचा एकही उमेदवार मैदानात नाही.

त्या तेरा गटांवरूनही यावे लक्षात...परंडा विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे १३ गट आहेत. या सर्व तेरा गटात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात स्वबळावर निवडणुकीत उतरले आहेत. विशेष म्हणजे, या सबंध मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकही उमेदवार विरोधात उतरवला नाही.

उद्धवसेनेवर निशाणा?शरद पवारांची राष्ट्रवादी लढत असलेल्या १२ जागांपैकी ११ जागेवर प्रतिस्पर्धी म्हणून सर्वाधिक उद्धवसेनेचे उमेदवार आहेत. एका जागेवर आघाडीतील काँग्रेस प्रतिस्पर्धी आहे. सोबतच याठिकाणी भाजप व शिंदेसेनाही प्रतिस्पर्धी आहेत.

प्रदेश उपाध्यक्षांची पुष्टी...जिल्हा परिषदेची निवडणूक ही दोन्ही राष्ट्रवादींनी मिळून लढवावी, असा निरोप देण्यासाठी अजितदादांनी मला दोनवेळा फोन केला होता. पहिल्यांदा हा निरोप देऊन शरद पवार साहेबांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सांगितले. दुसऱ्या पुन्हा फोन करून चर्चा झाली का, अशी विचारणा केली. महायुतीच्या बैठकीत हा विषय आपण मांडलाही होता.-प्रा. सुरेश बिराजदार, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)

English
हिंदी सारांश
Web Title : NCP factions avoid clashes in district elections, fueling merger speculation.

Web Summary : Dharashiv district elections hint at pre-poll understanding between NCP factions, avoiding direct competition. Merger talks intensify following Ajit Pawar's actions, with no candidates facing each other in 28 seats, suggesting prior coordination.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६dharashivधाराशिवNCPराष्ट्रवादी काँग्रेस