उस्मानाबादेत जुगार अड्ड्यावर धाड; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 20:57 IST2018-09-17T20:56:34+5:302018-09-17T20:57:23+5:30
: शहरातील हनुमान चौकाजवळील एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी धाड मारली़

उस्मानाबादेत जुगार अड्ड्यावर धाड; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त
उस्मानाबाद : शहरातील हनुमान चौकाजवळील एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनीधाड मारली़ ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली असून, रोख रक्कमेसह जवळपास १ लाख ७७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या प्रकरणी पाच जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरातील हनुमान चौकाजवळील मामा का धाबा शेजारी असलेल्या इमारतीत पत्त्याचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती़ मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक आऱ राजा, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दिनेश जाधव यांच्यासह बिरमवार, वाघमारे, शेवाळे, राऊत, गोरे आदींच्या पथकाने रविवारी रात्री जुगार अड्ड्यावर धाड मारली़
यावेळी एक रिक्षा, दोन दुचाकी, १४ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ७७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ या प्रकरणी सायलू बिरमवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजिम शब्बीर पटेल, फिरोज चाँदसाब तांबोळी (दोघे रा़ उस्मानाबाद), अन्वर महंमद अली शेख, शरीफ शेर मोहंमद सय्यद, अमाननुल्ला अत्ताउल्ला सय्यद ( तिघे रा़ बेंबळी ता़उस्मानाबाद) या पाच जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोना शेवाळे हे करीत आहेत़