४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ५२ वर्षीय नराधमाला ५ वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:50 IST2026-03-26T18:49:50+5:302026-03-26T18:50:02+5:30

उमरग्याच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

Umarga Court Sentences 52-Year-Old Man to 5 Years Rigorous Imprisonment for Assaulting 4-Year-Old Minor | ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ५२ वर्षीय नराधमाला ५ वर्षे सक्तमजुरी

४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ५२ वर्षीय नराधमाला ५ वर्षे सक्तमजुरी

उमरगा : उमरगा शहरात आजोळी आलेल्या एका ४ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरडीला आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला उमरगा जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जोरदार चपराक लगावली आहे. आरोपी अनिल ऊर्फ अन्नाप्पा देवेंद्र कांबळे (वय ५२, रा. करहरी, ता. आळंद, कर्नाटक) याला विविध कलमांन्वये ५ वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तालुक्यातील पीडितीची आई आपल्या मुलाबाळासह माहेरी उमरगा येथे १३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी आल्या होत्या. यावेळी त्यांची ४ वर्षे १० महिन्यांची पीडित मुलगी महादेव मंदिराच्या आवारात खेळत होती. आरोपी अनिल ऊर्फ अन्नाप्पा देवेंद्र ऊर्फ देवप्पा कांबळे ऊर्फ कलकेरी याने पीडित मुलीस २० रुपये देऊन तिला उचलून कोरेगाव रोडला नेले व तिथे अंधाराचा फायदा घेत अत्याचार केला. मुलीचा शोध घेताना आई आणि मावशीला आरोपी विवस्त्र अवस्थेत आढळून आला, तर मुलगी जखमी अवस्थेत होती.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने त्याच दिवशी उमरगा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन सपोउपनि अनुसया माने यांनी तपासाअंती न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. उमरगा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांनी साक्षीदारांची साक्ष व सहायक शासकीय अभियोक्ता ॲड. संदीप देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अनिल ऊर्फ अन्नाप्पा देवेंद्र ऊर्फ देवप्पा कांबळे ऊर्फ कलकेरी यास भा.न्या.सं. कलम १३७ (२), अंतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी व ५००० रुपये दंड, भा. न्या. सं. मधील कलम ७६ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी व ५००० रुपये दंड, तसेच बा. लै. अ. प्र. कलम ८ कायद्याअंतर्गत आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी व १०,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

...यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार नोंदविण्यात आले. यापैकी पीडिताचे आई-वडील तसेच प्रत्यक्षदर्शी पवन पवार, डॉ. जमादार, संभाजी बिराजदार, पीडिताची मावशी व शेजारी, पीडिता तसेच तपासणी अधिकारी अनुसया माने, पिंक पथकाच्या पोउपनि यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

Web Title : 4 वर्षीय बच्ची पर अत्याचार करने वाले को 5 साल की सजा

Web Summary : उमरगा में 4 वर्षीय बच्ची पर अत्याचार करने वाले 52 वर्षीय व्यक्ति को 5 साल की कठोर कारावास और ₹20,000 का जुर्माना लगाया गया। आरोपी ने बच्ची को बहला-फुसलाकर उसके साथ दुष्कर्म किया। बच्ची की माँ ने आरोपी को रंगे हाथों पकड़ा।

Web Title : Man gets 5 years for assaulting 4-year-old girl

Web Summary : A 52-year-old man was sentenced to 5 years rigorous imprisonment and fined ₹20,000 for assaulting a 4-year-old girl in Umarga. The accused lured the girl, then assaulted her. The girl's mother found the accused in the act.