शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उस्मानाबादेत पोलीस निरीक्षकाच्या घरात सापडली चोरीची दुचाकी, कर्नाटक पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 8:49 PM

मूळचे वाशी येथील रहिवासी असलेले व लातूर जिल्ह्यातील जळकोट ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या वाशी येथील घराची आज कर्नाटक पोलिसांनी झडती घेतली.

वाशी (उस्मानाबाद) : मूळचे वाशी येथील रहिवासी असलेले व लातूर जिल्ह्यातील जळकोट ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या वाशी येथील घराची आज कर्नाटकपोलिसांनी झडती घेतली. त्यात चोरीस गेलेली एक दुचाकी आढळून आली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.

कर्नाटकातील कमलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमएच २४ एजे ४४२९ क्रमांकाची एक दुचाकी चोरीस गेली होती़ या दुचाकी चोरीचा तपास करीत असताना कमलनगर पोलिसांना ती वाशी येथील चंद्रसेन देशमुख यांच्या तपोवन भागातील घरात असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने आज  कमलनगर ठाण्याचे सहायक फौजदार तानाजी बेलकट्टे यांनी वाशी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चोरगे, कर्मचारी बोबडे, गोरे यांच्या मदतीने घराचे कुलूप तोडून आत पंचांसमक्ष झडती घेतली.

यावेळी संबंधित चोरीस गेलेली दुचाकी या पथकाला आढळून आली़ त्यांनी ही दुचाकी जप्त करुन याबाबत वाशी ठाण्यास तसा अहवाल दिला आहे़ ठाण्यातील डायरीलाही या अहवालाची नोंद करुन घेण्यात आली आहे़ कमलनगर पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी आपल्या सोबत नेली आहे़ ज्या घरात ही दुचाकी आढळून आली ते घर चंद्रसेन जगदेवराव देशमुख यांचे असल्याचे अहवालात म्हटले आहे़ सध्या चंद्रसेन देशमुख हे लातूर जिल्हा पोलीस दलात पोलीस निरीक्षक या हुद्द्यावर असून त्यांच्याकडे जळकोट ठाण्याची जबाबदारी आहे़ अधिकाऱ्याच्याच घरात चोरीचा मुद्देमाल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे़ 

सहा दिवसांपासून पाळतकमलगनर पोलिसांना दुचाकी वाशीतील घरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते सहा दिवसांपूर्वीच येथे दाखल झाले होते़ मात्र, घराला कुलूप असल्याने त्यांना शोध घेता आला नाही़ त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी घरावर सहा दिवस पाळत ठेवली. आज न्यायालयाकडून ‘सर्च वारंट’ मिळाल्यानंतर घराचे कुलूप तोडून झडती घेण्यात आली.

टॅग्स :theftचोरीKarnatakकर्नाटकPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर