शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाणेगव्हाण येथे दोन गट भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST

उस्मानाबाद : उसतोड संबंधीच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना परंडा तालुक्यातील वारेगव्हाण येथे ५ फेब्रुवारी रोजी ...

उस्मानाबाद : उसतोड संबंधीच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना परंडा तालुक्यातील वारेगव्हाण येथे ५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी परंडा ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

वाणेगव्हाण येथील पाटील कुटुंबीयांतील फुलचंद, यशवंत, भालचंद्र, सुमित, विश्वजीत, सुजीत, चेतन, सचिन, दुष्यंत, प्रताप, संग्रामसिंह यांच्या गटाचा गावातीलच जगताप कुटुंबीयांतील शहाजी, शिवाजी, सुषेन, सूरज, विलास, बाबुराव यांच्या गटाशी ५ फेब्रुवारी रोजी ऊसतोड संबंधीच्या कारणावरून वाद झाला. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, दगड, काेयता, कुळवाची फास, काठीने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी दोन्ही गटांतील सदस्यांनी परंडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास परंडा पोलीस करीत आहेत.

दगड नेल्याच्या कारणावरून एकास मारहाण

उस्मानाबाद : शेतातील दगड नेल्याच्या कारणावरून दाम्पत्याने एकास बेदम मारहाण केली. ही घटना लोहारा तालुक्यातील भातांगळी येथे २ फेब्रुवारी रोजी घडली. भातांगळी येथील किरण जगताप हे आपल्या शेतात बांधावर दगड लावत होते. यावेळी शेजारील शेतकरी दाम्पत्य भरत व अनिता फत्तेपुरे यांनी तेथे येऊन किरण जगताप यांना दगड नेल्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत, कत्ती, दगड, काठीने मारहाण करून जखमी केले. किरण जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

आर्थिक लाभावरून भावाने बहिणीस केली मारहाण

उस्मानाबाद : वडिलांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभावरून भावाने दोन बहिणींना वायरने मारहाण केली. ही घटना उस्मानाबादेत ४ फेब्रुवारी रोजी घडली.

उस्मानाबाद येथील बहीण-भाऊ वियश्री, भाग्यश्री व श्रीराम सुधाकर मुंबरे यांच्यात वाद आहे. ४ फेब्रुवारी रोजी श्रीराम मुंबरे यांनी बहिणी वियश्री व भाग्यश्री यांना राहत्या घरी लाथाबुक्क्यांनी व वायरने मारहाण केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद विजयश्री मुंबरे यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. यावरून श्रीराम मुंबरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.