शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

डोक्यावर कर्जाचा बोजा त्यात अतिवृष्टीने हातचं पीक गेल्याने दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:33 IST

धाराशिव आणि मानवत तालुक्यांतील घटना, कर्जाचाही दोघांवर बोजा

धाराशिव/परभणी : अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. तीन एकर शेतातील साेयाबीनचा चिखल झाला. त्यामुळे डाेक्यावरील कर्ज फेडू कसे, असे म्हणत धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष घेतले. त्यांना तातडीने येथील रुग्णालयात दाखल केले परंतु, उपचार सुरू असतानाच गुरुवारी (दि. २) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली गावातील ३७ वर्षीय शेतकऱ्यानेही विष घेऊन आपले जीवन संपवले.

वाखरवाडी येथील मयत शेतकऱ्याचे नाव पाेपट पवार असे आहे. त्यांना अवघी तीन एकर शेतजमीन हाेती. याच जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपल्या पाचजणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत. खरीप हंगामात त्यांनी संपूर्ण शेतात साेयाबीन केले हाेते. पीकही जाेमदार आले हाेते. त्यामुळे यंदा कर्जाची परतफेड करून चार पैसे हाती उरतील, असे ते कुटुंबीयांना नेहमी सांगत हाेते. असे असताना मागील आठ दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या साेयाबीनचा चिखल झाला. त्यामुळे कर्जाची परतफेड करण्यासाेबतच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमाेर उभा ठाकला. याच विवंचनेतून त्यांनी विषारी द्रव प्राषण केले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर बनल्याने गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्याेत मालवली. ही घटना कळताच रुग्णालय परिसरात थांबलेल्या मुलांसह कुटुंबीयांनी अक्षरशः हंबरडा फाेडला. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुलं, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार कैलास पाटील यांनी रुग्णालयात दाखल हाेत कुटुंबीयांना धीर देत सांत्वन केले. शेतकरी आत्महत्येची आठवडाभरातील जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.

मानोलीत शेतकऱ्याची आत्महत्यामानोली (जि. परभणी) : सततचा पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून ३७ वर्षीय शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री मानवत तालुक्यातील मानोली गावात घडली. कृष्णा प्रकाश सुरवसे (३७, रा. मानोली, ता. मानवत) असे मयताचे नाव आहे.कृष्णा सुरवसे यांच्याकडे दोन एकर शेती होती. या शेतीवर पाथरी स्टेट बँकेचे दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र, यंदा सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे व वर्षभराचा खर्च कसा करायचा या विवंचनेत कृष्णा सुरवसे यांनी बुधवारी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना कळताच कृष्णा यांचे भाऊ दत्ता सुरवसे यांनी त्यांना तत्काळ मानवत येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी