शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

केळीच्या शेतीतून ‘लाखाचे बारा हजार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST

बालाजी आडसूळ कळंब : केळीचे पीक तसे पाहिले तर नाजूक अन् जोखीम जास्त असलेले, परंतु, तितकेच हमखास उत्पन्न देणारे. ...

बालाजी आडसूळ

कळंब : केळीचे पीक तसे पाहिले तर नाजूक अन् जोखीम जास्त असलेले, परंतु, तितकेच हमखास उत्पन्न देणारे. यंदा मात्र घटत्या दराचा मोठा फटका केळीस बसला आहे. एकट्या वाकडी (के) या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या गावास लाखो रुपयाचा फटका बसला असल्याने, हमखास उत्पन्न देणारी ही शेती ही ‘लाखाचे बारा हजार’ करणारी ठरल्याच्या प्रतिक्रिया केळी उत्पादकांतून व्यक्त होत आहेत. खरीप व रबी हंगामातील नियमित पिके हे लहरी निसर्गावर बेतलेली आहेत. यामुळे ते पदरी पडतील का, याची शाश्वती ना शेतकऱ्यांना राहिली आहे, ना व्यवस्थेला. यातच थोडेबहुत पाणी असेल, तर उसाची शेती करावी म्हटलं, तर तेथेही एवढं पाणी व कष्ट घालूनही ‘गोडी’ चाखतात ते कारखानदारच. यामुळेच काही प्रयोगशील शेतकरी दीर्घकालीन फळपिकांकडे तर काही अल्पकालीन ‘तरकारी’ या भाजीपालावर्गीय पिकाकडे वळले. मात्र, येथेही लहरी निसर्ग व निर्ढावलेल्या व्यवस्थेचे दुष्टचक्र शेतकऱ्यांची पाठ सोडण्यास तयार नाही.

वेगवेगळ्या संकटावर मात करत पीक हाती आले, तर बाजारातील ‘दर’ शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य ‘मोल’ ठरवत नसल्याचे दिसून येत आहे. या सर्वांना मात देणारी शेती म्हणून केळी उत्पादनाकडे पाहिले जाते. जास्त पाणी, मेहनतीचे पीक असले, तरी हमखास व जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून केळीला ओळखले जाते.

यामुळेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या वाकडी (केज) येथील ऊस उत्पादक शेतकरी केळीकडे वळले. मात्र, मोठ्या मेहनतीने फळास आणलेल्या त्यांच्या केळी प्लॉटला दृष्ट लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्माही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

चौकट...

उत्पादन जागीच, उत्पन्न मात्र घटले

वाकडी (के) येथील सहा शेतकऱ्यांनी तब्बल २५ एकर क्षेत्रावर केळी पीक घेतले आहे. यात बालाजी पांडुरंग कोल्हे यांचे सहा एकर, अमोल नामदेव कोल्हे यांचे चार, संजय रसाळ यांचे तीन, श्रीराम कुरुंद व भागवत कोल्हे यांचे दोन तर दिगंबर कोल्हे यांचे आठ एकर क्षेत्र आहे. यासाठी एकरी त्यांचा दोन लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे, यासाठी बँकांची कर्जे घेतली. यातून सरासरी २५ ते ३० टनांचे उत्पादन गृहित धरले, तर ७५० टनापेक्षा जास्त उत्पादन अपेक्षित होते. वाकडीकरांनी मोठ्या कष्टाने हा पल्ला गाठला खरा. मात्र, त्यांना धक्का दिला तो दराने. गतवर्षी पंधरा ते सोळा रुपये सरासरी दराने गेलेली केळी यंदा तीन ते सहा रुपये दराने जात आहेत. यामुळे वाकडीकरांना लाखो रुपयाचा फटका बसला आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे दिसून येत आहे. एकुरका येथील शेतकऱ्यांची गतही यापेक्षा काही वेगळी नाही.

लॉकडाऊन बरं म्हणण्याची वेळ

जून-जुलैची मृगी किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरचा बहर शेतकरी घेतात. काढणी चालू झाल्यावर दराची साथ मिळाल्यास केळी ‘लखपती’ करते, परंतु यंदा लॉकडाऊन ते अनलॉक या कठीण काळात मिळालेला दरही आता मिळत नसल्याने लाखोंचा खर्च करून केलेली शेती आतबट्ट्याची ठरत आहे, असे वाकडी येथील माजी सरंपच व प्रगतशील शेतकरी बालाजी कोल्हे यांनी सांगितले.