शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३० एकर जमीन हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : येथील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास सलग्न ४३० रुग्ण खाटांच्या रुग्णालयास राज्य शासनानी ...

उस्मानाबाद : येथील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास सलग्न ४३० रुग्ण खाटांच्या रुग्णालयास राज्य शासनानी मंजुरी दिली आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि राज्य शासनाच्या नावे नोंद असलेली ३० एकर जमीन देखील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास आता नक्कीच गती मिळणार आहे.

या महाविद्यालयासाठी जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाची स्‍थावर व जंगम मालमत्‍ता नि:शुल्‍क वापरण्‍यास मान्यता देण्‍यात आलेली आहे. तसेच मंत्रिमंडळाच्‍या मान्‍यतेनंतर महसूल विभागाच्‍या सहमतीने येथील जिल्‍हाधिकारी यांच्‍यामार्फत आवश्‍यक जागा उपलब्‍ध करून देण्‍याबाबत सूचित करण्‍यात आले होते. त्‍याअनुषंगाने येथील जिल्‍हाधिकारी यांच्या दि. २८ मे २०२१ च्या आदेशानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या स्‍थापण्यासाठी उस्‍मानाबाद शहरातील शासकीय जमीन सर्व्हे नंबर १० मधील २.९७ हेक्टर आर आणि ७५९ मधील १.०९ हेक्टर आर अशी एकूण ४.०५ हेक्टर आर (१० एकर) जागा मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेचे संचालक यांच्‍याकडे हस्‍तांतरित केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भविष्‍यातील श्रेणीवर्धन तसेच इतर आरोग्‍य विज्ञान अभ्‍यासक्रम (नर्सिंग, फिजिओथेरेपी, बीएस्‍सी. पीएमटी इत्‍यादी) नव्‍याने सुरू करण्याकरिता अतिरिक्‍त २० एकर जागेची मागणी वैद्यकीय शिक्षण व संशोधनच्या संचालकांनी जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे केली होती. ७ जुलै रोजी झालेल्‍या आढावा बैठकीमध्‍ये वैद्यकीय शिक्षण व सांस्‍कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही २० एकर जमीन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेकडे तातडीने हस्‍तांतरित करण्‍याचे निर्देश दिले होते. या जमिनीच्या मागणीच्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी यांनी जागेची पाहणी करून उस्‍मानाबाद शहरातील शासनाच्या नावे नोंद असलेली सर्व्हे नंबर ४२६ मधील शहर विकास आराखड्यातील आरक्षण वगळून वाटपास शिल्‍लक असलेली २० एकर जमीन वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संस्थेच्या नावे हस्‍तांतरित करण्‍यात आली आहे. ही जागा सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता शेखर राजदेरकर यांच्या ताब्‍यात देण्‍यात आली आहे. या व्‍यतिरिक्‍त जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाच्या ताब्‍यात असलेली सहा हेक्‍टर ४० आर जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्‍तांतरित करण्‍याची कार्यवाही शासन स्‍तरावर करण्‍यात येत आहे.

चौकट......

पाठपुराव्याला आले यश

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्‍हाधिकारी, निवासी उपजिल्‍हाधिकारी, अधीक्षक भूमी अभिलेख उस्मानाबादचे तहसीलदार, नगर रचनाकार, उस्‍मानाबाद न.प.चे मुख्‍याधिकारी यांच्‍या चमूने वेळेत प्रक्रिया पूर्ण करून एकूण ३० एकर शासकीय जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावे करून त्‍यांच्या ताब्‍यात दिली आहे. यामुळे उस्‍मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीस गती प्राप्‍त झाली आहे. जिल्ह्याचे खासदार आणि सर्व आमदार (विधान परिषद व विधानसभा) यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीबाबत पाठपुरावा केला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत या पुढील कार्यवाही केली जात आहे.