वाऱ्यामुळे ज्वारी आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:29 AM2021-01-21T04:29:31+5:302021-01-21T04:29:31+5:30

भूम : तालुक्यातील यंदा सरासरीच्या जवळपास पाऊस झाल्याने शेतकरीवर्गास दिलासा मिळाला होता. परिणामी सद्यस्थितीत पिकेही जोमाने डोलत आहेत. परंतु, ...

The tide is horizontal due to the wind | वाऱ्यामुळे ज्वारी आडवी

वाऱ्यामुळे ज्वारी आडवी

googlenewsNext

भूम : तालुक्यातील यंदा सरासरीच्या जवळपास पाऊस झाल्याने शेतकरीवर्गास दिलासा मिळाला होता. परिणामी सद्यस्थितीत पिकेही जोमाने डोलत आहेत. परंतु, काही दिवसांपासून जोराचे वारे वाहू लागल्याने चार ते पाच फुटांपर्यंत वाढलेली ज्वारी आडवी होत असल्याचे दिसत आहे.

समाधानकारक पावसामुळे तालुक्यात ज्वारीची विक्रमी पेरणी झाली आहे. यामुळे चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांत आहे. ज्वारी पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री अपरात्री मेहनत घेत आहेत. सध्या हे पीक जवळपास सर्वच ठिकाणी पोटऱ्यात आले असून, चिपाडदेखील चार ते पाच फुटावर वाढले आहे. असे असतानाच वाऱ्याचा जोर वाढला आहे. यामुळे उंच वाढलेली ज्वारी जमीनदोस्त होत असून, यातून उत्पन्न घटण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागली आहे.

Web Title: The tide is horizontal due to the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.