कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:32 IST2021-04-10T04:32:22+5:302021-04-10T04:32:22+5:30

तालुक्यातील चिंचोली काटे येथील ९४ वर्षीय पुरुष २ एप्रिल रोजी रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात ...

Three killed by corona | कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

तालुक्यातील चिंचोली काटे येथील ९४ वर्षीय पुरुष २ एप्रिल रोजी रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला होता. त्यांचा तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात ८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. माकणी येथील ८० वर्षीय पुरुषाची ८ एप्रिल रोजी रॅपिड अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. याच दिवशी त्यांचा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. हे दोघेही दुर्धर आजाराने त्रस्त होते. दक्षिण जेवळी येथील ५१ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल २७ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार चालू असताना, ९ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णाला मात्र पूर्वीचा कुठलाही दुर्धर आजार नव्हता. तालुक्यात कोरोना बाधितांसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत चालला असून, नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत:च घेणे गरजेचे आहे, तसेच कुठला ही आजार अंगावर न काढता तत्काळ उपचार घ्यावेत, असे अवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक कटारे यांनी केले आहे.

Web Title: Three killed by corona