शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतकऱ्याची तिन्ही पोरं देशसेवेत, पोलीस शिपाई असणारे सख्खे भाऊ PSI बनले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 5:38 PM

रत्नापूर येथील शेतकरी महादेव देवकर व आशाबाई देवकर या दांपत्याला तीन मुले आहेत.

उस्मानाबाद – जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांची दोन मुले पीएसआय बनले आहेत. विशेष म्हणजे आपल्या कुटुंबाची बेताची परिस्थिती ओळखून या दोन्ही भावांनी प्रथम पोलीस शिपाई म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. त्यानंतरही, पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न उराशी बाळगून त्यांनी अखेर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले. परंडा तालुक्यातील रत्नापूर येथील विशाल देवकर व उमेश देवकर ही सख्खी भावंडे 22 तारखेला लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत.

रत्नापूर येथील शेतकरी महादेव देवकर व आशाबाई देवकर या दांपत्याला तीन मुले आहेत. मोठा विशाल, मधला उमेश व धाकटा रमेश अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, ही तिन्ही मुले आता देशसेवेत कार्यरत आहेत. विशाल आणि उमेश यांनी सर्वप्रथम पोलीस नाईक म्हणून पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केले. तर, आपल्या भावाची प्रेरणा घेऊन सर्वात लहान असलेल्या रमेशने भारतीय सैन्य भरतीची परीक्षा देऊन सैन्य भरतीच्या परीक्षेत यश मिळवले. त्यामुळे, रमेशही देशसेवेत कार्यरत झाला आहे. 

महादेव देवकर यांना आठ एकर कोरडवाहू शेती असूनही त्यांचे उत्पादन जेमतेमच होते. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात पाणी नसल्याने शेतीत झालेला खर्चही नीट निघत नव्हता. तरीही, दयनीय परिस्थितीत तिघा भावांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपली वाटचाल सुरूच ठेवली. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक तर पुढील शिक्षण भूम येथे घेतले. तिघेही अभ्यासात हुशार. गावात शैक्षणिक वातावरण नसताना महादेव-आशाबाई यांनी शेतात अपार कष्ट करीत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यामुळे लवकरात लवकर नोकरी मिळवणे ही गरज लक्षात घेऊन मुलांनी सुरुवातील पोलीस भरतीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे सुरुवातीलाच विशाल व उमेश यांनी पोलीस शिपाई पदाची परीक्षा उत्तीर्णही केली. आपल्या दोन्ही मोठ्या भावांची प्रेरणा घेऊनच सर्वात लहानधाकट्या रमेशनेही भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला. पोलीस शिपाई पदावर काम करीत असताना विशाल, उमेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. 22 एप्रिल रोजी नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ते उत्तीर्ण झाले आहेत. गावातील एकाच कुटुंबातील तिन्ही मुले देशसेवत कार्यरत असल्याने देवकर कुटुंबीयांचे समाजाकडू आणि गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, नुकतेच पीएसआय परीक्षा पास केल्यानंतर विशाल आणि उमेश यांच्यावरही पोलीस खाते आणि मित्रपरिवाराकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसUsmanabad policeउस्मानाबाद पोलीसFarmerशेतकरीexamपरीक्षा