काटेरी झुडुपात हरवली सुपतगावची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:38+5:302021-05-19T04:33:38+5:30

रस्त्यालगतची झुडुपे एवढी वाढली आहेत की, त्याच्या दोन्ही बाजूच्या फांद्या एकमेकांत गुंतल्याने दुचाकी, बैलगाडीसह इतर वाहनचालकांना डोळ्यांना इजा ...

Supatgaon lost in the thorn bushes | काटेरी झुडुपात हरवली सुपतगावची वाट

काटेरी झुडुपात हरवली सुपतगावची वाट

रस्त्यालगतची झुडुपे एवढी वाढली आहेत की, त्याच्या दोन्ही बाजूच्या फांद्या एकमेकांत गुंतल्याने दुचाकी, बैलगाडीसह इतर वाहनचालकांना डोळ्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी जि.प. सदस्य रफीक तांबोळी यांनी राजपूत मळा ते गायकवाड मळ्यापर्यंतच्या रस्ता या एक कि.मी. अंतरावरील काटेरी झुडुपे जेसीबीच्या साहाय्याने काढली होती, परंतु सध्या गायकवाड मळा ते सोम पाटील यांच्या शेतापर्यंत अनेक काटेरी झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही झुडुपे त्वरित काढून रस्ता झुडुपविरहीत करण्याची मागणी मोहद्दीन पांढरे, शंकर कस्तुरे, रवि राजपूत, श्रीकांत पोफळे, व्यंकट घोरपडे, तुळशीदास बंडगर आदी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जि.प. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता राजू चव्हाण यांचेशी संपर्क साधला असता, रहदारीस अडथळा ठरणारी सर्व काटेरी झुडुपे त्वरित काढून घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: Supatgaon lost in the thorn bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.