स्केटिंग स्पर्धेत विद्यार्थी चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:49 IST2021-02-23T04:49:52+5:302021-02-23T04:49:52+5:30

उमरगा : उस्मानाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत उमरगा येथील ओमसाई स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. ...

Students shine in skating competition | स्केटिंग स्पर्धेत विद्यार्थी चमकले

स्केटिंग स्पर्धेत विद्यार्थी चमकले

उमरगा : उस्मानाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत उमरगा येथील ओमसाई स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यात ११ वर्षाखालील वयोगटात जान्हवी घोडके प्रथम, गौरी जाधव द्वितीय तर मुलांमध्ये अर्जुन कवठे हा तृतीय आला. तसेच १२ वर्षे वयोगटात मनस्वी घोडके प्रथम तर प्राची भोसले तृतीय आली. १७ वर्षेखालील वयोगटात साई राठोड हिने प्रथम क्रमांक मिळविला. यशस्वी स्पर्धकांना रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष जयंत जगदाळे, सचिव प्रविण गडदे, अभय वाघोलीकर, निशांत होणमुडे, प्रतापसिंग राठोड, स्वामी आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

आंदोलन सुरूच

तुळजापूर : येथील तहसील कार्यालयासमोर मागील सहा दिवसांपासून चालेले लहुजी शक्ती सेनेचे बेमुदत धरणे आंदोलन सोमवारीही सुरूच होते. दरम्यान, सोमवारी तहसीलदार सौदागर तांदळे यांनी भेट देऊन चर्चा केली. मात्र, याचा उपयोग झाला नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, बालाजी गायकवाड, सूरज सगट, कुंडलीक भोवाळ, अमोल सगट, लक्ष्मण गायकवाड, डॉ. मारुती क्षीरसागर, आरती लोंढे, कोंडाबाई गायकवाड, लक्ष्मीताई गायकवाड, राहुल देडे आदी उपस्थित होते.

Web Title: Students shine in skating competition