ट्रकमधून वैद्यकीय उपकरणे चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:32+5:302021-02-06T04:59:32+5:30
उमरगा तालुक्यातील कोराळ येथील रमेश शिवाजी सुरवसे यांनी त्यांचा ट्रक १७ जानेवारी रोजी राहत्या घरासमोर उभा केला होता. अज्ञात ...

ट्रकमधून वैद्यकीय उपकरणे चोरले
उमरगा तालुक्यातील कोराळ येथील रमेश शिवाजी सुरवसे यांनी त्यांचा ट्रक १७ जानेवारी रोजी राहत्या घरासमोर उभा केला होता. अज्ञात चोरट्यांनी १७ ते २१ जानेवारीदरम्यान ट्रकवरील टारपोलीन फाडून आतील सुमारे ११ हजार किमतीचे वैद्यकीय उपकरणांनी भरलेले खोके चोरून नेले. याप्रकरणी सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरूम पोलीस ठाण्यात ३ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
रस्त्यावर वाहने उभे करणे आले अंगलट
उस्मानाबाद : रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस विभागाच्या वतीने कारवाया केल्या जात आहेत. बुधवारी उमरगा तालुक्यातील तुगाव येथील गोविंद कांबळे व तुरोरी येथील दिनेश जाधव यांनी आपआपल्या ताब्यातील वाहने अनुक्रमे क्र. एमएच. २६ सी ४६३१ व क्र. एमएच २५ आर ८९५४ हे उमरगा बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वर उभी केल्याचे उमरगा पोलिसांस आढळून आले. यावरून पोलिसांनी नमूद दोघांविरुद्ध स्वतंत्र दोन गुन्हे नोंद केले.
दसमेगावातून दोन शेळ्या अन् चार बोकड पळविले
उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील दसमेगाव येथील भिका खंडागळे यांनी त्यांच्या घरासमोर दोन शेळ्या व चार बोकड बांधले होते. ते अज्ञात चोरट्यांनी २ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चोरी झाल्याचे समजतात खंडागळे यांनी वाशी पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली. यावरून गुन्हा नोंद झाला आहे.
४० वर्षीय महिलेचे विनयभंग
उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका गावातील ४० वर्षीय महिलेचा गावातीलच एका पुरुषाने शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
एका खेडेगावातील ४० वर्षीय महिला घरी एकटीच होती. याचा फायदा घेत गावातीच एका पुरुषाने तिच्या घरासमोर येऊन आरडाओरड केली. याचा जाब त्या महिलेने त्याला विचारला असता त्या पुरुषाने शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात संबंधित पुरुषाविरुद्ध गुन्हा नोंद झाला.