बापासोबत वाद, पोराचे थेट कोयत्याचे वार; नळदुर्गमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:26 IST2025-05-28T18:21:39+5:302025-05-28T18:26:36+5:30
नळदुर्ग शहरातील थरार; खुन्नस का दिली म्हणून सुरू झालेल्या वादातून सामाजिक कार्यकर्त्याचा जीव गेला

बापासोबत वाद, पोराचे थेट कोयत्याचे वार; नळदुर्गमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
नळदुर्ग (जि. धाराशिव) : ‘‘माझ्या वडिलांना मारताेस काय?’’ असे म्हणत हाती धारदार शस्त्र (काेयता) घेऊन आलेल्या बावीस वर्षीय तरुणाने सपासप वार करून चाळीस वर्षीय व्यक्तीचा मुडदा पाडला. ही थरारक घटना नळदुर्ग बस्थानकासमाेरील एका हाॅटेलच्या समाेर मंगळवारी रात्री उशिरा घडली.
याप्रकरणी बुधवारी नळदुर्ग पाेलिस ठाण्यात बाप - लेकाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्ग येथील बसस्थानकाजवळ असलेल्या शिवराज हाॅटेलमध्ये मंगळवारी रात्री मयत सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे (ह. मु. पनवेल) व आराेपी जयकुमार गाेरख गायकवाड (४८, रा. बाैध्दनगर, नळदुर्ग) हे वेगवेगळ्या ठिकाणी बसले हाेते. या दाेघांमध्ये नजरानजर झाली असता, रागाने का पाहिले? असे म्हणत एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. वाद वाढल्यानंतर या दाेघांनाही हाॅटलच्या चालकाने बाहेर पाठविले अन् वाद आणखी विकाेपाला गेला. याचवेळी आराेपी जयकुमार गायकवाड याने भांडणाची माहिती मुलगा साेहन जयकुमार गायकवाड (२२, रा. बाैध्दनगर, नळदुर्ग) यास दिली. हाती काेयता घेऊन अवघ्या काही क्षणातच ताे तिथे दाखल झाला. ‘‘माझ्या वडिलांना मारताेस काय?’’, असे म्हणत सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे यांच्या मानेवार धारदार काेयत्याने वार केला. जमिनीवर काेसळल्यानंरही सपासप वार केल्याने ते रक्ताच्या थाराेळ्यात पडले व प्राणज्याेत मालवली.
एका आरोपीस अटक
सामाजिक कार्यकर्ते म्हणून मयत सूर्यकांत यांची नळदुर्गसह परिसरात ओळख हाेती. दरम्यान, याप्रकरणी मयताची पत्नी करूणा सूर्यकांत सुरवसे (४२) यांनी बुधवारी नळदुर्ग पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जयकुमार गाेरख गायकवाड (४८) व साेहन जयकुमार गायकवाड (२२, दाेघे रा. बाैद्धनगर, नळदुर्ग) यांच्याविरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरून या बाप-लेकाविरूद्ध खुनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. घटनेनंतर अवघ्या काही क्षणात पाेलिसांनी आराेपी साेहन गायकवाड यास अटक केली, तर जयकुमार गायकवाड याच्यावर साेलापूर येथे उपचार सुरू आहेत.