शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! बस सुरू होताच अचानक पेटली; जळत्या बसमधून प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:14 IST

थरारक! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसच्या केबिनने अचानक घेतला पेट; चालकाने ७० प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने अनर्थ टळला

- बालाजी बिराजदारलोहारा ( धाराशिव) : बसवकल्याण - तुळजापूर एसटी बसने अचानक पेट घेतला. याप्रसंगी चालकाच्या सर्तकतेमुळे बसमधील ७० प्रवाशी बाल बाल बचावले. ही घटना लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेटवर शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता घडली आहे.

तुळजापूर आगाराची एसटी बस रोज दुपारी साडेतीन वाजता तुळजापुरहून लोहारामार्गे  बसवकल्याणला मुक्कामी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बसवकल्याणहून ही बस परत लोहारा मार्गे तुळजापूरला जाते. शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही एसटी बस बसवकल्याणहून निघाली सकाळी पावणे नऊच्या सुमारास लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेट समोर प्रवासी उतरण्यासाठी व चढण्यासाठी थांबली. याप्रसंगी प्रवासी गाडीत बसल्यानंतर बस चालक एम. व्ही. घंटे यांनी बस सुरू करताच बसच्या केबिनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच. चालक घंटे यांनी प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यातच बसच्या केबिनमध्ये जाळ लागला. चालक घंटे यांच्या सर्तकतेमुळे बसमधील ७० प्रवाशी बालबाल बचावले.

धुराचे लोट अन् प्रवाशांचा आरडाओरडा बस सुरू करताच केबिनमधून सुरुवातीला धूर निघाला, त्यामुळे चालकाने लागलीच सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. प्रवाशी उतरण्यास सुरुवात होताच केबिनमध्ये आग लागून धुराचे लोट बाहेर पडू लागले. यामुळे प्रवाशी घाबरून आरडाओरडा करत होते. जीव मुठीत घेऊन सर्व प्रवाशी धुरातून रस्ता काढत कसेबसे बसच्या बाहेर पडले. काही प्रवाशांनी तर खिडकीमधून उडी घेत सुटका करून घेतली. सर्व प्रवाशी सुखरूप असले तरी प्रचंड घाबरलेले आहेत. 

साखर कारखान्याचे अग्निशामक दल धावलेयाप्रसंगी तात्काळ लोकमंगल साखर कारखान्याचे अग्निशामक गाडी आल्याने आग आटोक्यात आली. या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसच्या साह्याने तुळजापुरला सोडण्यात आले. या घटनेची माहिती वाहक बी.ए.गोरे यांनी लोहारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक तुकाराम घोडके यांना दिली. असता वाहतूक नियंत्रक घोडके यांनी लोहारा पोलीस ठाण्यात माहिती दिली.

टॅग्स :Accidentअपघातstate transportएसटीdharashivधाराशिव