धक्कादायक ! उस्मानाबादेत गुन्हेगारांची ठाण्यासमोरच पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 19:27 IST2018-12-03T19:26:15+5:302018-12-03T19:27:10+5:30

रोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांस दोघांनी मारहाण केली़

Shocking In Osmanabad, the policeman beaten by criminals in front of the police station | धक्कादायक ! उस्मानाबादेत गुन्हेगारांची ठाण्यासमोरच पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

धक्कादायक ! उस्मानाबादेत गुन्हेगारांची ठाण्यासमोरच पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

उस्मानाबाद : पोलीस ठाण्याच्या गेटसमोर असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांस दोघांनी मारहाण केली़ ही घटना रविवारी सायंकाळी बेंबळी येथे घडली असून, या प्रकरणी दोघाविरूध्द बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद तालुक्यातील धारूर येथील दोघांविरूध्द बेंबळी पोलीस ठाण्यात गुरनं २१५/१८ भादंवि कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल आहे़ या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी रविवारी सायंकाळी बेंबळी ठाण्यासमोरील गेटवर आले होते़ त्यावेळी पोलीस कर्मचारी अनिल रघुनाथ मामीलवाड हे त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले़ त्यावेळी त्या दोघांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची फिर्याद अनिल मामीलवाड यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात दिली़ मामीलवाड यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब महादेव कदम, गणेश ज्ञानदेव जगताप (दोघे रा़ धारूर ता़उस्मानाबाद) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
 

Web Title: Shocking In Osmanabad, the policeman beaten by criminals in front of the police station