शरद पवारांनी जागवल्या आठवणी, माजी आमदार आलुरे गुरुजींना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 20:46 IST2021-08-02T20:45:04+5:302021-08-02T20:46:23+5:30
तुळजापूर तालुका व मराठवाड्यात शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सेवा आणि सचोटीचा आदर्श निर्माण करत भरीव कार्य करणारे सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांच्या निधनाने एक कर्तृत्वनिष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे.

शरद पवारांनी जागवल्या आठवणी, माजी आमदार आलुरे गुरुजींना वाहिली श्रद्धांजली
अणदूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार, शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव सि.ना.आलुरे गुरूजी यांचे सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील एका रुगणालयात उपचार सुरू असताना निधन झाले. आज दुपारी तीन नंतर त्यांच्या पार्थिवावर अणदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरवरुन गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तुळजापूर तालुका व मराठवाड्यात शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सेवा आणि सचोटीचा आदर्श निर्माण करत भरीव कार्य करणारे सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांच्या निधनाने एक कर्तृत्वनिष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. आयुष्यभर ज्ञानाची उपासना करणार्या आलुरे गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
तुळजापूर तालुका व मराठवाड्यात शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सेवा आणि सचोटीचा आदर्श निर्माण करत भरीव कार्य करणारे सिद्रमप्पा आलुरे गुरूजी यांच्या निधनाने एक कर्तृत्वनिष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. आयुष्यभर ज्ञानाची उपासना करणार्या आलुरे गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 2, 2021
सिद्रामप्पा आलुरे हे १९८० मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले होते. त्यांनी शेकापचे तत्कालीन विद्यमान आमदार माणिकराव खपले यांचा १४ हजार ५७९ मतांनी पराभव करून विजय संपादन केला होता. या निवडणुकीत आलुरे गुरुजी यांना ३४ हजार १२१ तर खपले यांना १९ हजार ५४२ मते पडली होती. १९८५ ला मात्र शेकापचे माणिकराव खपले पुन्हा एकदा निवडून आले होते. त्यांनी आलुरे गुरुजी यांचा जवळपास ११ हजार २३० मतांनी पराभव केला. तेव्हा खपले यांना ४२ हजार ५५३ तर काँग्रेसचे आलुरे गुरुजी यांना ३१ हजार ३२३ मते मिळाली होती.