कळंब तालुक्यातील लोहटा येथे घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 19:41 IST2019-06-10T19:40:30+5:302019-06-10T19:41:22+5:30

शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

robbery at Lohata in Kalamb taluka | कळंब तालुक्यातील लोहटा येथे घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास

कळंब तालुक्यातील लोहटा येथे घरफोडीत लाखाचा ऐवज लंपास

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) येथील घर फोडून चोरट्यांनी सुमारे १ लाख २० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, लोहटा (पूर्व) येथील भगवान विठ्ठल भोसले हे कामानिमितत्त बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम मिळून तब्बल १ लाख २० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर भोसले यांनी शिराढोण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंविचे कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Web Title: robbery at Lohata in Kalamb taluka