उस्मानाबाद : ‘माझ्या घराची वीज का ताेडली’? अशा शब्दात जाब विचारून महावितरणच्या कर्मचाऱ्यास एकाने धक्काबुक्की केली. ही घटना तेरणा चाैकात १७ जुलैला घडली. या प्रकरणी आनंदनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विद्युत महावितरण कंपनीचे संजय नानू पवार हे १७ जुलैला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तेरणा महाविद्यालय चाैकातून कार्यालयीन कामानिमित्त जात हाेते. याचवेळी उस्मानाबाद येथीलच साेमनाथ बालाजी पांढरे यांनी ‘माझ्या घराचे वीज कनेक्शन का ताेडले. पुन्हा आमच्या परिसरात फिरायचे नाही का’, अशा धमकी देऊन धक्काबुक्कीही केली. या घटनेनंतर महावितरणचे कर्मचारी पवार यांनी आनंदनगर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून पांढरे याच्याविरुद्ध भादंसंचे कलम ३५३, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.