(फोटो : जाधवर १२)
उमरगा : देशात सध्या १४ कोटीच्या जवळपास ज्येष्ठ नागरिक आहेत. नोकरदार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळते. परंतु, बिगर नोकरदार ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत दक्षिण मराठवाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) अंतर्गत उमरगा येथे शिवपार्वती ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य शिवानंद दळगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी. आर. पाटील (लातूर), सचिव प्रभाकर कापसे (आलमल) आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या कार्याविषयी कापसे यांनी सविस्तर माहिती दिली. कमलाकर भोसले यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब माळी यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्यंकटराव पाटील, मधुकरराव गुरव, सुभाष शिंदे-पाटील, बाबुराव रणखांब, वेदपाठक, पंचप्पा सगरे. पार्वतीबाई सगरे, मीनाक्षी माळी, संगप्पा कोष्टी, सुभाष माळी आदी उपस्थित होते.
चौकट......
कार्यकारी मंडळ केले जाहीर
यावेळी शिवपार्वती ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून कार्यकारी मंडळ नियुक्त करण्यात आले. यामध्ये अध्यक्ष बाळासाहेब माळी, उपाध्यक्ष चनबस मलंग, सचिव शिवानंद दळगडे, सहसचिव कमलाकर भोसले, कोषाध्यक्ष शरण्णाप्पा मलकट्टे, सहकोषाध्यक्ष काशीनाथ मुत्ते यांची निवड करण्यात आली.