कळंब, येरमाळा येथील जुगारावर पाेलिसांचा छापा

By राजकुमार जोंधळे | Updated: January 9, 2024 19:50 IST2024-01-09T19:50:24+5:302024-01-09T19:50:48+5:30

या प्रकरणी तिघांविराेधात गुन्हा दाखल...

Police raid on gambling in Kalamba, Yermala | कळंब, येरमाळा येथील जुगारावर पाेलिसांचा छापा

कळंब, येरमाळा येथील जुगारावर पाेलिसांचा छापा

धाराशिव : जिल्ह्यातील कळंब आणि येरमाळा पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत तीन ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर पाेलिस पथकांनी मंगळवारी छापा मारला आहे. यावेळी जुगाराचे साहित्य आणि राेख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत कळंब आणि येरमाळा पाेलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत कळंब पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दाेन ठिकाणी छापेमारी केली. पाशा दगडू शेख (वय ३६, रा. चौंदे गल्ली, कळंब) येथील पानटपरीलगत कल्याण नावाचा मटका घेताता आढळून आला. दुसऱ्या घटनेत साजिद मुस्ताफा मुंडे (वय २६, रा. कळंब) हा आठवडी बाजार मैदान येथे कल्याण नावाचा मटका घेताना आढळून आला. या दाेघांकडून जुगाराचे साहित्य आणि राेकड जप्त केली आहे. तिसरा छापा येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाेलिसांनी मारला असून, धम्मपाल देवर्षी वाघमारे (वय ३०, रा. येरमाळा ता. कळंब) हा मुंबई मेन बाजार नावाचा मटका चालवीत असल्याचे आढळून आले. पाेलिसांनी येथे छापा मारून जुगाराचे साहित्य, राेख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत येरमाळा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Police raid on gambling in Kalamba, Yermala