महाआवास योजनेत पारगाव अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST2021-08-15T04:33:12+5:302021-08-15T04:33:12+5:30
पारगाव : राज्य सरकारने ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राबविलेल्या महाआवास अभियानात (ग्रामीण) पारगावची ग्रामपंचायत घरकूल बांधकामात जिल्ह्यात ...

महाआवास योजनेत पारगाव अव्वल
पारगाव : राज्य सरकारने ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राबविलेल्या महाआवास अभियानात (ग्रामीण) पारगावची ग्रामपंचायत घरकूल बांधकामात जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले. या अभियान कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) उत्कृष्टपणे राबविणाऱ्या संस्था व व्यक्तींना जिल्हास्तरावरील महाआवास अभियान पुरस्कार व महाआवास अभियान विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये वाशी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पारगाव क्लस्टरमधील पारगाव ग्रामपंचायतीला जिल्ह्यातील प्रथम क्रमांक मिळाला. शिवाय, वाशी तालुकाही या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आल्याने गटविकास अधिकारी व सभापती यांचाही सत्कार केला जाणार आहे.
यासाठी वाशीचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच महेश कोळी, उपसरपंच पंकज चव्हाण, ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्वच सदस्य, कर्मचारी यांनी झोकून देऊन काम केले होते.
140821\img_20201120_110745.jpg~140821\img_20210126_120215.jpg
गटविकास अधिकारी घरकुल बांधकामास भेट देते वेळीचा फोटो~घरकुल लाभार्थी सत्कार करताना गटविकास अधिकारी विलास खिल्लारे