शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : सातवा वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीतील फरकाच्या थकबाकीचा पहिला हप्ता मिळावा, या प्रमुख मागणीसाठी नगर परिषद अधिकारी, ...

उस्मानाबाद : सातवा वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीतील फरकाच्या थकबाकीचा पहिला हप्ता मिळावा, या प्रमुख मागणीसाठी नगर परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १२ जुलैपासून पालिका कार्यालयासमाेर बेमुदत संप सुरू केला आहे. या आंदाेलनामुळे पालिकेचे दिवसभर कामकाज ठप्प झाले हाेते.

राज्यातील नगर परिषदा, नगर पंचायतीतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन श्रेणी लागू करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सुधारित वेतन श्रेणी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास व प्रत्यक्ष वेतन १ सप्टेंबर २०१९ पासून देण्यास मान्यता मिळालेली आहे. १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीतील थकबाकी २०१९-२० पासून समान पाच वार्षिक हप्त्यात देण्यास मान्यता आहे. त्यानुसार उस्मानाबाद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष वेतन १ सप्टेंबरपासून देण्यात आलेले आहे, तर १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीतील थकबाकीचा एकही हप्ता अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही. मागील २ वर्षापासून राज्यासह जिल्ह्यामध्येही कोविड -१९ चा प्रादुर्भाव असल्याने व नगर परिषदांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असल्याने इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे उपस्थितीच्या अनुषंगाने काेणतीही सवलत दिली नाही. त्यामुळे कार्यालयात १०० टक्के उपस्थिती हाेती. दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झपाट्याने वाढ हाेत असतानाही दाेन वर्षांपासून महागाई भत्ता दिलेला नाही. त्यातच सातव्या वेतन आयाेगातील फरकाचा पहिला हप्ताही अद्यापपर्यंत मिळालेला नाही. उपराेक्त मागणी तातडीने मार्गी लावावी, या प्रमुख मागणीसाठी उस्मानाबाद पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने बेमुदत संप सुरू केला आहे. या आंदाेलनामुळे पालिकेचे कामकाज दिवसभर ठप्प हाेते. या आंदाेलनात नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक तानाजीराव तावडे, सचिव रावसाहेब अंबादास शिंगाडे, मार्गदर्शक संभाजी राजेनिंबाळकर, उपमुख्य अधिकारी पृथ्वीराज पवार, कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी, भारत साळुंके, सेवानिवृत्त कर्मचारी मोहन देशपांडे, उमाकांत राऊत यांच्यासह शंभरावर कर्मचारी सहभागी झाले हाेते.