उस्मानाबादेत बस-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 19:14 IST2018-07-14T19:13:19+5:302018-07-14T19:14:07+5:30
भरधाव वेगातील बस-दुचाकीची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील शिवाजीनगर भागात घडली़

उस्मानाबादेत बस-दुचाकी अपघातात एक ठार
उस्मानाबाद : भरधाव वेगातील बस-दुचाकीची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील शिवाजीनगर भागात घडली़
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी येथील रामकिसन हनुमंत शिरगिरे (वय-३५) हे त्यांचे सहकारी बिभिषण आण्णाराव सूर्यवंशी (वय-४०) यांच्या समवेत शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़१३-ए़एस़१४३३) बेंबळीच्या दिशेने येत होते़ त्यांची दुचाकी शिवाजीनगर जवळ आली असता समोरून आलेल्या उस्मानाबाद- उजनी बसशी (क्ऱएम़एच़२०-बी़एल़-१७२९) जोराची धडक झाली़ या अपघातात दुचाकी चालक रामकिसन शिरगिरे यांचा मृत्यू झाला़ तर बिभिषण सूर्यवंशी हे जखमी झाले़ अपघातानंतर बेंबळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला़ जखमीवर बेंबळी येथील रूग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले़ या प्रकरणी अंकुश शिरगिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक सतीश पाडे यांच्याविरूध्द बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ एस़एस़घायाळ हे करीत आहेत़