तेर येथे रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:57 IST2018-06-21T15:55:23+5:302018-06-21T15:57:22+5:30
रेल्वेच्या धडकेत एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली़

तेर येथे रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
तेर (उस्मानाबाद ) : रेल्वेच्या धडकेत एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली़ ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील बुकनवाडी शिवारातील रेल्वे मार्गावर घडली़
उस्मानाबाद तालुक्यातील बुकनवाडी येथील मिनीनाथ व्यंकट गंपले (वय-४०) या व्यक्तीचा गुरूवारी सकाळी गावच्या शिवारातील उस्मानाबाद- लातूर रेल्वे मार्गावर मृतदेह आढळून आला़ घटनेची माहिती मिळताच पोलीस, नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली़ बुधवारी रात्रीच्या सुमारास मिनीनाथ गंपले यास अज्ञात रेल्वेने धडक दिल्याचे दिसून येते़ घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असून, ढोकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास फौजदार नंदकुमार दंडे हे करीत आहेत़