पैशाच्या कारणातून अमृतवाडीत एकावर कु-हाडीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:21 IST2018-10-26T17:19:54+5:302018-10-26T17:21:01+5:30

पैशांच्या कारणावरून कुऱ्हाड, लोखंडी गजाने एकावर वार करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

One attacked In Amritwadi by money matter | पैशाच्या कारणातून अमृतवाडीत एकावर कु-हाडीने वार

पैशाच्या कारणातून अमृतवाडीत एकावर कु-हाडीने वार

तुळजापूर (उस्मानाबाद ) : पैशांच्या कारणावरून कुऱ्हाड, लोखंडी गजाने एकावर वार करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी सकाळी तालुक्यातील अमृतवाडी येथे घडली़

तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी येथे गोविंद वसंत दळवे (वय ३३ वर्षे रा.अमृतवाडी) याने तुळजापूर ठाण्यात फिर्याद दिली आहे़ गावातीलच किरण दयानंद चितळे, दत्ता रमेश जाधव, विश्वास विलास जाधव, बाळू शामराव जाधव, प्रशांत कैलास भांगे यांनी सोमवारी सकाळी पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून चाकू, कुऱ्हाड, गज घेऊन रस्त्यात अडविले़ किरण चितळे याने डाव्या पायाच्या नडगीवर कुऱ्हाडीने वार केला़ तर दत्ता जाधव याने उजव्या खांद्यावर गजाने मारून गंभीर जखमी केले़ इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गोविंद दळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ गोविंद दळवे यांच्या फियार्दीवरून किरण चितळे, दत्ता जाधव, विश्वास जाधव, बाळू जाधव, पप्रशांत भांगे (सर्व रा.अमृतवाडी ता़तुळजापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

Web Title: One attacked In Amritwadi by money matter