नगराध्यक्ष कुटुंबीयांच्या हॉटेललाही केला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST2021-03-26T04:33:05+5:302021-03-26T04:33:05+5:30
प्रशासनाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत बाजारपेठ चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही आज गुरुवारी सायंकाळी ७ वाजून ...

नगराध्यक्ष कुटुंबीयांच्या हॉटेललाही केला दंड
प्रशासनाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत बाजारपेठ चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही आज गुरुवारी सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी नगर परिषदेच्या पथकाला नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचे परळी रोडवरील हॉटेल चालू असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने हॉटेलला तत्काळ २ हजार रुपयांचा दंड करून तो भरूनही घेतला. याबाबत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही नियम मोडला असेल तर दंड भरावाच लागेल, असे स्पष्ट केले.
खुद्द नगराध्यक्षांच्या कुटुंबीयांच्या हॉटेलला दंड केल्याने प्रशासनाने आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कठोर व सर्वसमावेशक पावले उचलण्याचे धोरण हाती घेतल्याने कोरोना पसरविण्यास कारणीभूत ठरत असलेल्या व्यापारी, नागरिकांच्या प्रवृत्तीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.