आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 13:19 IST2020-10-02T13:18:48+5:302020-10-02T13:19:54+5:30
आरक्षण तत्काळ लागू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी करीत उस्मानाबाद शहरातील भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेना आ. कैलास पाटील यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
उस्मानाबाद : आरक्षण तत्काळ लागू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी करीत उस्मानाबाद शहरातील भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेना आ. कैलास पाटील यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाच्या आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीच्या विरोधात उस्मानाबादेत शुक्रवारी ‘ढोल बजाओ आंदोलन’ करण्यात आले. आंदोलक भगवा झेंडा घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण टिकवा नाहीतर मराठा समाजाच्या खासदार, आमदारांनी राजीनामा द्या’, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
आंदोलकांनी सकाळी ११ वाजता भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील कार्यालयासमोर व १२ वाजण्याच्या सुमारास शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या कार्यालयासमोर ढोल वाजवत आंदोलन केले. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते.